नागपूर : भारतीय हवामान खात्याने कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. शनिवारी उपराजधानीसह विदर्भातील काही शहरांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्तर भारतासह संपूर्ण देशात जोरदार थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झाला आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरात किंवा तापमानाचा पारा कमी कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्यानेही महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असा इशारा दिला होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.

हेही वाचा : “शिवसेनेचे दोन्ही गट पात्र ठरवण्याचा नार्वेकरांचा निर्णय म्हणजे न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन,” अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांचे मत

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होत आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, यादरम्यान शनिवारी उपराजधानीत रात्रीच्या सुमारास अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर विदर्भातील काही शहरात देखील शनिवारी पावसाच्या सरी कोसळल्या. आता भारतीय हवामान खात्याने सुद्धा विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज दिला आहे. त्यानुसार पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून शेतकऱ्यांची चिंता वाढला आहे.