वर्धा: राजकारणात दोन कट्टर राजकीय नेते जाहीरपणे भांडतात. मात्र, त्यांचे एकमेकांशी मधुर संबंध कायम असतात. मात्र आता हे पाहून संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.

भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते रोज भांडत असल्याचे नवे नाही. हिंगणघाट येथे मात्र भाजपाचे आमदार समीर कुणावार यांनी राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी यांच्याशी हात मिळवून बाजार समितीत प्रवेश केला. सोबत काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनाही घेतले. तर भाजपाचे स्वतंत्र पॅनल खासदार रामदास तडस यांनी टाकले.

हेही वाचा… खळबळजनक! मद्यपान करून पीडितेच्या घरात शिरला, काठीने मारहाण केली व ठार मारण्याची धमकी देत बलात्‍कार केला

निवडून आल्यावर कोठारी हे आ.कुणावार यांचे अभिनंदन करण्यास त्यांच्या घरी पोहोचले आणि तसे फोटो जाहीर झळकले. तेच पाहून भाजपानिष्ठ संतापले आहेत.

वॉट्सॲपवर एक संदेश भाजपा वर्तुळात चांगलाच व्हायरल होत आहे. यात संताप व्यक्त करणारा कार्यकर्ता म्हणतो, ‘चहापेक्षा गरम होणाऱ्या किटल्यांनो कुणावार व कोठारी हे एकमेकांचे राजकीय विरोधक असून तुम्हा आम्हास भांडत ठेवतात. आपण पक्षनिष्ठा म्हणून त्यांनी टाकलेल्या तुकड्यांवर त्यांनी पाठविलेल्या गाडीत बसून त्यांना मतदान करून देतो. आपल्या जवळच्यांना कचरा समजून बाजूला करतात. आता तुमचे काम संपले. आता तुम्हाला न्यायला गाडी येणार नाही. जे काही तुकडे, नाल्याचे ठेके भेटेल, ते यांच्या मागे मागे फिरणाऱ्यांना. आपल्या मुलांना काम नाही म्हणून मग मुलगी कोण देणार. वय वाढत जाणार. आता मात्र कुणावार साहेब व कोठारी साहेब एसी रूममध्ये एकत्र बसून आनंद लुटणार. आता बसा बोंबलत राधे राधे’ अशा शब्दात भाजपाचा निष्ठावंत व्यक्त होत आहे.

हेही वाचा… वर्धा : उपमुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका पक्ष नेत्यास विचारणा केल्यावर तो म्हणाला की सत्य तेच व्यक्त झाले. बहुतांश मौन राहतात. तर एखादा चिडून उठतो. ही प्रतिक्रिया धडा देणारी ठरावी.