नागपूर : महाराष्ट्रच नाही तर देशभरात सूर्य आग ओकू लागला आहे. प्रत्येक २४ तासांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होत आहे. त्यामुळे सकाळी १०-११ वाजेनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तर सायंकाळी देखील वातावरणात उकाडा आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने देशभरातच मे महिन्यात तापमान चढलेले राहील असे सांगितले आहे.

महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे. तर उत्तर भारतात देखील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा तसेच गुजरात या राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. कमाल तापमानसह किमान तापमानात देखील वाढीचा अंदाज असून याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसणार आहे. त्यामुळे मे महिन्यात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान, अधूनमधून अवकाळी पाऊस मात्र डोकावणार असल्याने तापमानसोबतच उकाड्यात देखील प्रचंड वाढ होणार आहे.

हेही वाचा : ‘बालिका वधू…’, अखेरचे मंगलाष्टक सुरू असतानाच लग्नमंडपी असे काही घडले की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भासह मध्यप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात पावसाच्या सरी कोसळतील. उत्तर पश्चिम भारतातील अनेक भाग, मध्य भारताचे काही भाग, नॉर्थ ईस्ट भारतात सामान्य ते जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश हरियाणा, चंडीगड,दिल्ली, पंजाब राजस्थानमध्ये चार ते सहा मे दरम्यान पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यूपी, बिहार , हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.