नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार असून त्यांनी त्यांच्या खात्यामार्फत शहरात अनेक रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे भुयारी मार्ग उभारले आहेत. तसेच काही उड्डाणपुलाचे कामे सुरू देखील आहेत. शहरातील मुस्लीम बहुल मोमीनपुऱ्यात देखील एका उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

कडबी चौक ते गोळीबार चौक रेल्वे उड्डाणपुलाची लँडिग (उतरण) टीमकी येथे होत आहे. यास मोमीनपुरा येथील निवासी आणि दुकानदारांनी विरोध केला आहे. टीमकी येथे उड्डाणपूल उतरत असल्याने स्थानिकांची अडचण होणार आहे. आजबाजूचे छोटे-छोटे पाच-सहा रस्ते अडवले जाणार आहेत. वाहतूक कोंडी निर्माण आहे.

महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) हे उड्डाणपूल तयार करत आहे. पुलाचे भूमिपूजन झाले, तेव्हा लँडिंग गोळीबार चौकापासून काही अंतरावर होणार होती. सध्या ती टिमकी येथील गुप्ता आट्टा चक्की जवळ आहे. या प्रकल्पाच्या मूळ नियोजनाप्रमाणे गोळीबार चौकात लँडिग करण्यात यावी, अशी मागणी आहे. २.८२ किलोमीटरचा हा उड्डाण पूल आहे. त्याला १४६ कोटी रुपये खर्च होत आहे. जुलै २०२१ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे.

टिमकी येथे लँडिंग करण्यात आल्याने बाजुबाजूचे पाच ते सहा रस्ते बंद होणार आहेत. तसेच शाळा, रुग्णालय, शॉपिंग कॉम्लेक्स आणि जुने कब्रिस्तान यांच्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे लँडिंग गोळीबार चौकाजवळ करण्यात अशी मागणी करून “अपना वादा पुरा करो ब्रिज की लँडिंग गोळीबार चौक पर करो”, असे मोमीनपुरा येथे फलक लाऊन आवाहन करण्यात आले.

दरम्यान, शहरातील कामठी मार्गावरील एलआयसी चौक ते ऑटोमोटीव्ह चौक दरमान्य चार स्तरीय वाहतूक असलेला डबर डेकर उड्डाण पूल आशिया खंडात प्रथमच तयार करण्यात आला आहे. अभियांत्रिकीच्या या अप्रतिम कलाकृतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी वर्धा मार्गावरील डबल डेकर पुलाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. नागपुरात अजनी चौक ते एअरपोर्ट हा डबल डेकर उड्डाणपूल, पूर्व नागपूरच्या पारडी मध्ये असणारा डबल-डेकर पूल आहे. सर्व उड्डाणपूल एनएचएआयने उभारले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामठी मार्गावरील डबल डेकर उड्डाण पूल एनएचएआय आणि महामेट्रोने पूर्ण केलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आशियातील सर्वात लांब डबल डेकर मार्गांपैकी एक आहे. ८९७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलामध्ये केवळ डबल डेकर पुलाचा खर्च ५७३ कोटी रुपये आहे.