नागपूर: महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने प्रशिक्षणार्थी लिपिक आणि इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एमएससी बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. सदर भरती अंतर्गत एकूण १५३ पदांवर भरतीद्वारे नियुक्त्या करण्यात येणार आहेत.  अधिसूचनेनुसार, भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया १० ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून ३० ऑक्टोबर २०२३ हा अर्ज नोंदणीच शेवटचा दिवस असेल. उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील तपासावे आणि त्यानुसार अर्ज करावा. एमएससी बँकेच्या या भरतीमध्ये चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : १५३

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : ४५ जागा

प्रशिक्षणार्थी लिपिक १०७ जागा : १०७ जागा

कनिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये स्टेनो टायपिस्ट : १ जागा

हेही वाचा >>>पत्नीला तलाकची कागदपत्रे घेऊन बोलविले, मात्र पतीच्या मनात काही वेगळेच होते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाइन लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • लेखी परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत असेल.
  • वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी, उमेदवारांना पात्रता गुण म्हणून एकूण गुणांच्या किमान ५० टक्के म्हणजेच १०० गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.