नागपूर: नव्या पिढीला भारतीय हवाई दलाचा इतिहास, परंपरा आणि हवाई दलाच्या प्रारंभी पासून आजवर वापरात असलेले विमाने, हेलिकॉप्टर, रडार आणि इतर उपकरणांची माहिती देणारे हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय नागपुरात सुरू झाले आहे. हे संग्रहालय मंगळवार वगळता आठवडाभर खुले करणार आहे.

नागपुरातील वायुसेनानगर येथे ‘एअर फोर्स म्युझियम’चे उदघाटन शुक्रवारी मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. एअरफोर्स म्युझियममध्ये भारतीय लष्करी हवाई वाहतुकीच्या आठवणींचा समृद्ध संग्रह आहे आणि भारतीय हवाई दलाचा इतिहास प्रदर्शित केला आहे. संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर एमआय ८ हेलिकॉप्टर, मिग-२१ लढाऊ विमाने आणि पिचोरा क्षेपणास्त्र आहे.

संग्रहालयाच्या विविध विभागांमध्ये आयएएफचा इतिहास, दृकश्राव्य विभाग, उपकरण प्रदर्शन विभाग, शस्त्र विभाग इत्यादींचा समावेश आहे.
संग्रहालयात ‘फ्लाईंग सिम्युलेटर’ विभाग देखील आहे. तेथे अभ्यागतांना लढाऊ उड्डाणाचा ‘रिअल टाइम’अनुभव घेता येणार आहे.

मंगळवार व शासकीय सुटीचा दिवस वगळता सर्व दिवशी सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेनुसार संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवाई दलाच्या संग्रहालयाचा मुख्य उद्देश हवाई दलाचा इतिहास, उत्क्रांती आणि कर्तृत्वाचे जतन आणि प्रदर्शन करणे आहे. तसेच हवाई दलाचे जवान आणि त्यांच्या योगदानाबद्दल नवीन पिढीला माहिती मिळावी आणि प्रेरणा घेता यावी यासाठी आहे.