बुलढाणा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदाचे निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाले. किरकोळ अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी प्रस्तापित राजकारण्यांना धक्का बसला असून मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- nagpur Gram Panchayat Election Result 2022: उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दत्तक गावात काँग्रेसचा झेंडा

सरपंच पदासाठी दोन ठिकाणी झालेली फेरमोजणी, दोन्ही ठिकाणी कायम असलेला निकाल, येळगावमधील दोन गटात उडालेली चकमक, महाविकास आघाडीचे वर्चस्व, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला चंचूप्रवेश ही निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरली. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहराला लागून असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी आणि श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या सावळा-सुंदरखेडमधील लढत प्रारंभीपासूनच अटीतटीची ठरली. सरपंच पदासाठी तब्बल १० उमेदवार रिंगणात उतरले होते. मावळत्या सरपंच अपर्णा राजेश चव्हाण ( १५८४) यांनीच पुन्हा बाजी मारली. निकटचे प्रतिस्पर्धी प्रतीक दिलीप जाधव ( १४८८) व संतोष राजपूत( १४४७) यांनी तुल्यबळ लढत दिली. प्रतीक जाधव यांनी अर्ज दिल्यावर फेरमोजणी घेण्यात आली असता निकाल कायम राहिला.

हेही वाचा- नागपूर : अधिवेशनादरम्यान युवा आमदारांचा झणझणीत ‘सावजी’वर ताव; सभागृह तहकूब होताच गाठले हॉटेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येळगावमध्ये सरपंच पदासाठी चुरशीची लढत झाली. विजयी उमेदवार दादा श्रीराम लवकर ( ९५६ मते) यांनी अशोक गडाख( ९४७) यांचा निसटता पराभव करून बाजी मारली. येथेही फेरमोजणी घेण्यात आली असता कौल लवकर यांच्या बाजूनेच कायम राहिला. यानंतर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. मात्र, पोलीस व समंजस नागरिक यांनी मध्यस्थी केल्याने तूर्तास संघर्ष टळला. दत्तपुर येथे स्वाभिमानीचे संदीप कांबळे यांनी बाजी मारली. उर्वरित विजयी सरपंच पुढीलप्रमाणे आहे. इरला- मोहन खंडागळे, मोंढाळा – सविता काळे, रुईखेड मायंबा- सुरेखा फेपाळे, सव- इंदू शेळके, उमाळा- पंडित सपकाळ, गिरडा- सुनीता गायकवाड. एकूण निकाल पाहता तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिल्याचे चित्र आहे.