नागपूर : मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवान प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विरोधात मैदानात उतरले आहे. मंगळवारी मकर संक्रातीनिमित्त शहरातील अनेक मैदानांमध्ये मोठ्या संख्येत लहान मुले, तरुण आणि नागरिकांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी विविध मैदानांमध्ये जावून नायलॉन मांजाच्या विरोधात कारवाई केली.

मकर संक्रातीला पतंग उडवण्याची प्रथा आहे. परंतु, त्यासाठी अलिक नायलॉन मांजाचा वापर केला जातो. त्यातून अपघात होऊन अनेकांचा बळी जातो. पक्षांवरही मृत ओढोवतो. म्हणून या मांजाचा वापर होऊ नये याकरिता उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी विविध नागपूर शहरातील विविध ममैदानात जावूनन मांजाची तपासणी केली.

हेही वाचा : टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात

नायलॉन मांजामुळे होणारे अपघात, होणारी जीवितहानी, पक्ष्यांना होणारे त्रास या सर्वांची माहिती नागरिकांना देऊनन त्यांनी नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले.

महिला पोलीस जखमी

नागपुरात नॉयलॉन मांजाने एका महिलाला जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल खेडकर या सीताबर्डी पोलीस ठाण्यात अंंमलदार आहेत. आज दुपारी २ वाजता त्या दुचाकीने कर्तव्यावर जात होत्या. दरम्यान, रस्त्यावरील एका खांबावर अडकलेला नॉयलान मांजा शीतल यांच्या डोक्याला गुंडा‌ळल्या गेला. त्यामुळे त्यांनी हाताने मांजा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मांजा शीतल यांच्या नाकाला घासल्या गेला. त्यामुळे शीतल यांचे नाक चिरल्या गेले. रक्ताची धार बघून त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली. त्यांनी डोक्याला गुंडाळलेला मांजा बाजुला केला. काही नागरिकांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली. शीतलला बाजुला असलेल्या लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या शीतलवर उपचार सुरु आहे.

हेही वाचा : अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१८ लाखांचा नायलॉन मांजा नष्ट

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला शहर पोलिसांनी सुमारे १८ लाखांचा नायलॉन मांजा नष्ट केला. नायलॉन मांजाच्या हजारो चकऱ्यांवर पोलिसांनी सोमवारी बुलडोजर फिरवला. गेली काही वर्षे नायलॉन मांजाचा वाढता वापर पक्षी आणि माणसांसाठी जीवघेणा ठरत आहे. मकर संक्रांतीच्या या काळात अनेकांचा गळा, नाक कापल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच पक्षांचाही हकनाक जीव जात असल्याचेही समोर आले आहे. यासंदर्भात जनजागृतीसाठी विविध सामाजिक संघटनानी मोर्चेही काढले. महापालिकेने मध्यंतरी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला मात्र, असे असूनही या जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.