पैशाच्या वादातून एकाने आपल्या मित्राचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री एक वाजता अग्रेसन चौकात घडली. परवेज शेख पापा मिया शेख (३०, रोशनबाग,खरबी) असे मृत युवकाचे नाव आहे. तर परवेज याकूब खान (२८, पारडी) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. परवेज शेख हा पूर्वी सोडा बनविणाऱ्या कंपनीत काम करीत होता. तसेच तो आणि परवेज खान हे दोघेही भूखंड खरेदी-विक्री करण्याच्या व्यवसायात कार्यरत होते.

हेही वाचा >>> “कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचं आमिष दाखवून तरुणींना जाळ्यात ओढलं अन्…”, नागपूरमधील धक्कादायक प्रकार समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांनी काही दिवसांपूर्वी एक भूखंड विकला होता. त्यातून आलेल्या  काही रक्कम परवेज शेखला देणे होते. परंतु, गेल्या काही दिवासंपासून परवेज खान हा पैसे देण्यासाठा टाळाटाळ करीत होता. त्यातून दोघांचा वाद सुरु होता. मंगळवारी रात्री १२ वाजता परवेज खानने त्याला फोन केला. ‘तुझे पैसे परत करायचे आहे, अग्रेसन चौकात भेट.’ असा निरोप दिला. त्यामुळे परवेज शेख हा मित्र कलीम शेख याच्यासोबत दुचाकीने अग्रेसन चौकात पोहचला. तेथे आरोपी परवेज खान आणि त्याचे चार साथिदार दबा धरुन बसले होते. तेथे दोघांचा पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. त्यानंतर परवेज खान व त्याच्या साथिदारांनी परवेज शेखचा चाकूने भोसकून खून केला. सकाळी सहा वाजता हत्याकांड उघडकीस आले. या प्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी परवेज खानला अटक केली.