नागपूरमध्ये करोना तीन लाटा संपल्यानंतर दोन वर्षांनी हिवाळी अधिवेशन पार पडतं आहे. या अधिवेशन काळातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसं पत्रक काढलं आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातले सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना आणि येणाऱ्या सगळ्या नागरिकांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे?

नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसंच या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये करोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
corona-mask
संग्रहित छायाचित्र

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकात काय म्हटलं आहे?

सद्य स्थितीत करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये कोव्हिड १९ ची लाट पसरली आहे. या विषाणूचा शिरकाव भारतात होऊन पुन्हा एकदा करोनाच्या चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी मास्कचा उपयोग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यलाय, अस्थापन येथील अधिकारी आणि कर्मचारी तसंच भेट देणारे नागरिक यांनी मास्कचा वापर करावा.

मोदी सरकारचा मोठा निर्णय: चीन, जपानसह ‘या’ देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी बंधनकारक!

नागपूरमध्ये सुरू आहे हिवाळी अधिवेशन

नागपूरमध्ये करोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. हे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनी नागपूरमध्ये भरलं आहे. या ठिकाणीही मास्क सक्ती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासंदर्भातला निर्णय हा नागपूर महापालिकेचे आयुक्त घेऊ शकणार आहेत. त्यामुळे तसं घडलं तर अधिवेशनातही मास्क लावणं सक्तीचं होईल अशीही शक्यता आहे.

करोनाची लाट जपान आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर

करोनाची लाट चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आली आहे. या ठिकाणी रोज शेकडो रूग्णांना करोनाची बाधा होते आहे. BF 7 या नव्या व्हेरिएंटने या दोन देशांमध्य कहर माजवला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत करोनाची लाट भारतात येऊ नये किंवा आल्यास काय काय करता येईल याचा आढावा दररोज घेतला जातो आहे. मागच्या तीन दिवसात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दोनवेळा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि राज्यांमधला आढावा घेतला आहे. तसंच सर्व आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितलं आहे.