नागपूर : अवैध चिकन मटन मार्केट ला छुपा पाठिंबा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना मनसेने दिली कोंबड्यांची भेट दिल्या. गेल्या वर्षभरा पासून सहकार नगर परिसरात असलेल्या अवैध चिकन मटन मार्केटच्या विरोधात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिकेच्या झोन एक लक्ष्मी नगरला वारंवार निवेदन सादर केले, मात्र या अवैध मार्केट चालविणाऱ्या लोकांसोबत मनपातील काही लोकांचे संबंध असल्याने या अवैध मार्केटला महानगरपालिकेची छत्रछाया लाभल्याने अखेर संतप्त होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज झोन एक चे सहाय्यक उपायुक्त श्री.चौधरी यांना कोंबड्या भेट दिल्या .
तत्पूर्वी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व मनसेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने श्री चौधरी यांचेशी अवैध मार्केट मुळे होणारा त्रास, वाढलेली दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य, वाढते अपघात, अपघातात एका महिलेचा झालेला मृत्यू, या विषयावर विस्तृत चर्चा केली, त्याच प्रमाणे हे विक्रेते कोण आहेत ? ते कुठले नागरिक आहेत ? त्याची माहिती मनपा जवळ का नाही ? अश्या विविध प्रश्नांचा भडिमार करून कोंबड्यांची भेट देऊन यापुढेही सहकार नगर येथील अवैध मार्केट सुरूच ठेवले तर आज कोंबड्या भेट दिल्या काही दिवसात झोन कार्यालयाच्या परिसरात आम्ही अवैध मार्केट सुरू करू असा इशारा दिला . मनसेच्या शिष्टमंडळाच्या संतप्त भावना लक्षात घेऊन ताबडतोब अवैद्य मार्केट हटविले जाईल असे आश्वासन सहाय्यक आयुक्त श्री. चौधरी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात मनसेचे राज्य सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री सचिन धोटे, नागपूर शहर उपाध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे यांचे सोबत विभाग अध्यक्ष श्री हर्षल दसरे,महिला सेना नागपूर शहर अध्यक्षा सौ. रोशनी ताई खोब्रागडे, विभाग अध्यक्षा सौ. प्रिया बोरकुटे, सचिव कुमारी गुंजन पांगुळ, उपाध्यक्ष सौ.कुंदाताई मानकर, विभाग संघटक श्री चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष श्री रामोजी खोब्रागडे, श्री अजिंक्य मिश्रा, श्री विपिन धोटे, नितेश यादव, श्री योगेश चनापे, श्री बादल मुराई, श्री राकेश डोंगरदिये , श्री समशेर अन्सारी, श्री दोहेंद्र ठाकरे,श्री चेतन बोरकुटे व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.