नागपूर : राज्याच्या किनारपट्टी भागांवरून घोंगावणारे वादळ पुढे सरकत असतानाच विदर्भात मात्र तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढत चालला आहे. विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान ४३ अंशाच्याही पलीकडे गेले आहे. आता केरळमध्ये मान्सूनची घोषणा हवामान खात्याने केल्यानंतर महाराष्ट्रालाही पावसाचे वेध लागले आहेत.

हेही वाचा – नागपूर : जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू

कमाल तापमानातच नाही तर किमान तापमानातही वाढ होत आहे. त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. मुंबई आणि पालघर भागांमध्ये समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे या भागांमध्ये आर्द्रतेचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येत आहे. राज्यात उकाडा अधिक असतानाच मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी दिसून येत आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानाच्या धर्तीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने केरळमध्ये मान्सूनची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातही तो लवकरच येईल. मात्र, उन्हाचा दाह पाहता सर्वांनाच मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.