scorecardresearch

Premium

नवनीत राणांनी घेतली अजित पवारांची भेट; म्‍हणाल्‍या, ”राष्‍ट्रवादीचा पाठिंबा मिळत आला आहे”

उपमुख्‍यमंत्री अजित पवार एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आले असून शनिवारी खासदार नवनीत राणा यांनी त्‍यांची भेट घेतली.

Navneet Rana meet Ajit Pawar in Amravati
नवनीत राणांनी घेतली अजित पवारांची भेट; म्‍हणाल्‍या, ''राष्‍ट्रवादीचा पाठिंबा मिळत आला आहे'' (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अमरावती : उपमुख्‍यमंत्री अजित पवार एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आले असून शनिवारी खासदार नवनीत राणा यांनी त्‍यांची भेट घेतली. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या नेत्‍या सुरेखा ठाकरे यांच्‍या येथील निवासस्‍थानी ही भेट झाली. लोकसभा निवडणुकीच्‍या हालचालींना वेग आलेला असताना नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतल्‍याने राजकीय चर्चा रंगली आहे.

”मी युवा स्‍वाभिमान पक्षाची खासदार आहे. हा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. गेल्‍या निवडणुकीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. आजही आम्‍ही एकत्रच आहोत. मला युवा स्‍वाभिमान पक्षाचे अध्‍यक्ष रवी राणा यांच्‍याकडे उमेदवारी मागावी लागेल. त्‍यानंतर ते कुणाचा पाठिंबा घ्‍यायचा याविषयी निर्णय घेतील. आम्‍ही अजित पवार यांच्‍याबरोबर नेहमीच होतो. त्‍यांनी आपल्‍याला उमेदवारी दिली होती. त्‍यांची मी ऋणी राहणारच आहे”, असे नवनीत राणा यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

Amol Mitkari on Rajesh Tope
‘राजशे टोपे सहा आमदारांसह अजित पवार गटात येणार’, अमोल मिटकरींचा दावा; म्हणाले, “मार्चमध्ये विध्वंस..”
family members at Hyderabad airport
१८ वर्ष दुबईच्या तुरुंगात घालविल्यानंतर पाच भारतीय नागरिक परतले; कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू
What Jitendra Awhad Said?
“आज अजित पवारांनी शरद पवारांची राजकीय गळचेपी केली आणि..”, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Hemant Dabhekar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची ‘वर्षा’वर भेट घेणारा हेमंत दाभेकर कोण?

हेही वाचा – भंडारा : नर्सिंग महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, काहींची प्रकृती गंभीर

आपण राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढणार का, असे विचारले असता नवनीत राणा म्‍हणाल्‍या, ”मी एनडीएमध्‍ये आहे. येणाऱ्या काळात जनतेला माझ्याकडून जे अपेक्षित असेल, ते आपण करणार आहोत”.

हेही वाचा – वर्धा : चक्क पतीच निघाला दुचाकी चोर, होता भलताच डाव…

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच अजित पवार यांची भेट घेतली. आगामी निवडणुकीतील भूमिकेविषयी त्‍यांच्‍यात चर्चा झाल्‍याचे सांगण्‍यात येते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mp navneet rana met ajit pawar in amravati know what navneet rana said mma 73 ssb

First published on: 09-12-2023 at 15:23 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×