नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ आणि तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा गट-ब या परीक्षांसाठी जुलै २०२२, एप्रिल २०२३मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

या सर्व पदांसाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मुंबई येथे २९ ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा दोन पाळ्यांमध्ये सकाळी ८.३० ते ९.३० वाजता तर दुसऱ्या पाळीत ११.३० ते १२.३० वाजता होणार आहे. परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

हेही वाचा… VIDEO: ताडोबात ‘बबली’च्या पिलांची धमाल; पर्यटकांना भुरळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण आदी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. संवर्गनिहाय स्वतंत्र तसेच सामाजिक चाळणी परीक्षेमधील गुणांच्या आधारे संवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल.