नागपूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आनंदाची बातमी आहे. आयोगाने नवीन १७० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कला निर्देशालयअंतर्गत सरकारी महाविद्यालांमध्ये विविध विषयांसाठी सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी पात्र व अहर्ताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर आहे. अर्ज करताना अंतिम तारखेला उमेदवाराचे वय १८ ते ४५ दरम्यान असावे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आदींना वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता आहे.

हेही वाचा – नागपूरसह पाच शहरांत सीबीआयचे छापे, ७ जणांना अटक; प्रकरण काय? वाचा…

हेही वाचा – भाजपाच्या ओबीसी नेत्यांचा फडणवीसांवर विश्वास नाही का? आश्वासनानंतरही मोर्चासाठी नागपुरात बैठक

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भातील अटीशर्ती, शैक्षणिक अर्हता व अनुभव पात्रता आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी.

Story img Loader