नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत. ‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ आणि ‘स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांकरिता’ शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून रखडलेली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे.

हेही वाचा : बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार

अशी राहणार गुणांची अर्हता

सन-२०२२ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही. सन-२०२३ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

हेही वाचा : नागपूर : ब्रेक निकामी झाल्यामुळेच घडला ‘तो’ विचित्र अपघात, चालकास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शारीरिक चाचणीचा तपशील

स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता १) गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण-१५२) पुलअप्स- कमाल गुण-२०३) लांब उडी- कमाल गुण-१५४) धावणे (८०० मीटर)- कमाल गुण-५०स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता १) गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण-२०२) धावणे (४०० मीटर) – कमाल गुण-५०३) लांब उडी- कमाल गुण-३०