Nagpur Rain Breaking News Today, 9 July 2025: मागील दोन – तीन दिवसांपासून कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. विदर्भातही अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गेल्या ६० तासांपासून सतत पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी देखील सुरूच आहे. यादरम्यान पावसाने एकदाही विश्रांती घेतली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजेपर्यंत या कालावधीत जिल्ह्यात सुमारे १७२.२ मिलिमिटर पाऊस पडला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक रस्ते, महामार्ग बंद करण्यात आले. तसेच गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून ताज्या घडामोडी, बातम्या जाणून घ्या.

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi

20:26 (IST) 9 Jul 2025

आयटी पार्कचा वीजपुरवठा सुरळीत, महावितरणची माहिती; वीज वाहिनीतील बिघाड दुरुस्त

हिंजवडी आणि पेगासस उपकेंद्रातील वीजपुरवठा देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी ‘महापारेषण’कडून रविवारी सकाळी ११ वाजता बंद करण्यात आला होता. ...सविस्तर वाचा
20:15 (IST) 9 Jul 2025

सनदी लेखापाल आत्महत्या प्रकरणी तरुणीसह दोघांना अटक

या दोघांनी १८ महिन्यांमध्ये राज यांच्याकडून तीन कोटी रुपये खंडणी उकळली होती. या दोघांच्या त्रासाला कंटाळून राज यांनी आत्महत्या केली. ...वाचा सविस्तर
20:15 (IST) 9 Jul 2025

सनदी लेखापाल आत्महत्या प्रकरणी तरुणीसह दोघांना अटक

या दोघांनी १८ महिन्यांमध्ये राज यांच्याकडून तीन कोटी रुपये खंडणी उकळली होती. या दोघांच्या त्रासाला कंटाळून राज यांनी आत्महत्या केली. ...वाचा सविस्तर
20:04 (IST) 9 Jul 2025

पेट्रोल पंपावरील सव्वा कोटी रुपये लंपास; व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

पेट्रोल पंपाच्या बॅंक खात्यातील, तसेच दररोज जमा होणारी रोकड त्याने परस्पर आपल्या आणि मित्राच्या बॅंक खात्यात वळती केली. ...सविस्तर बातमी
19:07 (IST) 9 Jul 2025

मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता राज ठाकरेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, ‘सातबारा कोरा यात्रेत’...

बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
18:57 (IST) 9 Jul 2025

हृदयद्रावक! विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, टीनपत्रावर ठेवलेल्या छत्रीला...

शेतावर जाण्यासाठी निघालेल्या एका शेतकऱ्याने टीनावर ठेवलेली छत्री हातात घेतली, मात्र छत्रीला विद्युत प्रवाहित झाल्याने जोरदार धक्का लागून त्याच्या घात झाला. ...सविस्तर बातमी
18:31 (IST) 9 Jul 2025

भारत हायस्कूलमधील गैरसोयींवर शिवसेनेचा जाब; सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा

ठाणे पूर्वेकडील भारत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आरोग्यविषयक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने पालक तसेच विद्यार्थी हैराण झाले आहेत. ...सविस्तर बातमी
18:23 (IST) 9 Jul 2025

धक्कादायक! भरदिवसा कारमध्ये अतिप्रसंगासाठी जबरदस्ती

एका विमा कंपनीतील व्यवस्थापक तरुणीवर त्याच कंपनीच्या एजन्टने भरदिवसा कारमध्ये अतिप्रसंगासाठी जोर जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...अधिक वाचा
18:12 (IST) 9 Jul 2025

गोंडवाना विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण? कुलसचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

गोंडवाना विद्यापीठात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनातून संबंधित कंत्राटदार कंपनी मोठी कपात करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
17:39 (IST) 9 Jul 2025

डोंबिवली देवीचापाडा खाडीतील बेकायदा भरावाची महसूल, कांदळवन अधिकाऱ्यांकडून पाहणी; कठोर कारवाईचा तहसीलदारांचा इशारा

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गणेशघाट विसर्जन भागात उल्हास खाडी किनाराचा भाग बेकायदा भराव करून तेथे बांधकामाची आखणी करणाऱ्या भूमाफियांच्या विरुध्द महसूल अधिकाऱ्यांनी चांगलाच फास आवळला आहे. ...वाचा सविस्तर
17:30 (IST) 9 Jul 2025

टिटवाळा काळू नदीत बुडणाऱ्या तीन जणांना ग्रामस्थांनी वाचवले

टिटवाळ्या जवळील काळू नदी परिसरात फिरण्यासाठी आलेले तीन जण मंगळवारी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी काळू नदीत उतरले. खोल पाण्याचा आणि पाण्याच्या वाढत्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे तिघे जण वाहून गेले. ...सविस्तर बातमी
17:28 (IST) 9 Jul 2025

मोदी सरकारमध्ये महत्वाचे मंत्री असलेल्या गडकरींचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ धोक्यात; प्रकरण न्यायालयात गेल्याने...

नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या काही प्रकल्पांना पर्यावरणवादी व स्थानिक नागरिकांकडून विरोध झाला आहे. ...सविस्तर वाचा
17:17 (IST) 9 Jul 2025

‘वीज कंपनी जनतेच्या मालकीची, नाही कुणाच्या…’, ठाण्यात काँग्रेसने दिला घोषणाबाजी…

बुधवारी ठाणे काँग्रेसने निषेध आंदोलन केले. या दरम्यान, ‘वीज कंपनी जनतेच्या मालकीची, नाही कुणाच्या बापाची’,‘अदानी हटाव देश बचाव’, असे नारे कार्यकर्त्यांनी दिले. ...सविस्तर वाचा
17:10 (IST) 9 Jul 2025

गोंदिया : नळाला दूषित पाणी, अनेकांना अतिसाराची लागण...

जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जवळील भिवखिडकी येथे गेल्या आठ दिवसांपासून नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असताना आज बुधवार ९ जुलै रोजी १५ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. ...वाचा सविस्तर
16:30 (IST) 9 Jul 2025

पावसामुळे नागपूर शहरात पूरस्थिती; काँग्रेसनेते विधानसभेत आक्रमक, मुख्यमंत्री म्हणतात…

काँग्रेस नेते म्हणाले, "गेल्या वर्षी घडलेल्या परिस्थितीचा विचार करता, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सरकारने अनेक कामे मंजूर केली, परंतु वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे आज नागपूरचे लोक पाण्यात बुडत आहेत. ...सविस्तर बातमी
15:24 (IST) 9 Jul 2025

'लोकसत्ता'च्या वृत्ताची दखल : रुग्णवाहिका फसलेला रस्त्याचे रात्रभरातून डांबरीकरण; कामावर प्रश्नचिन्ह..

ऐन पावसाळ्यात गावात करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळं रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात रुग्णवाहिका फसली. यामुळे गरोदर महिलेला चिखलातूनच पायी वाट काढत जावे लागले होते. ...वाचा सविस्तर
15:07 (IST) 9 Jul 2025

संगमनेरमध्ये बेकायदा कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंश मांससह साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेरमध्ये सातत्याने गोवंशाची कत्तल होत असल्याच्या मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करत आमदार अमोल खताळ यांनी वरिष्ठांना खोटी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. ...वाचा सविस्तर
14:53 (IST) 9 Jul 2025

खासगीकरण धोरणाविरोधात वसईत महावितरण कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप

अलिकडेच काही खासगी कंपन्यांनी महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरणाचा परवाना मिळावा यासाठी अर्ज केले आहेत. ...सविस्तर बातमी
14:42 (IST) 9 Jul 2025

पिंपरी : आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन पार्किंग बुकिंग, कशी करणार बुकिंग?

महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) उपक्रमांतर्गत नागरिकांना सुलभ पद्धतीने वाहनतळाची नोंदणी करण्यासाठी 'व्हॉट्सअ‍ॅप पार्किंग' डिजिटल सेवा सुरु केली आहे. ...सविस्तर बातमी
14:28 (IST) 9 Jul 2025

Video : डॉक्टरने भर रस्त्यावर स्वतःला पेटवून घेतले! अकोल्यात मृत्यूशी झुंज, नांदुरा परिसर हादरला

यावेळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवून आग विझविली असली तरी स्वतःला पेटवून घेणाऱ्या इसमाची प्रकृती गंभीर असून तो उपचारदरम्यान मृत्यूशी झुंज देत आहे. ...सविस्तर बातमी
14:00 (IST) 9 Jul 2025

खळबळजनक! शारीरिक संबंधास नकार; पतीने पत्नीचा गळाच चिरला…

खून केल्यानंतर आरोपी आसिफ स्वतः पोलीस ठाणे वसंतनगर येथे हजर झाला आणि आपण पत्नीला गळा चिरून मारले, असे सांगितले. ...वाचा सविस्तर
13:48 (IST) 9 Jul 2025

झाड पडलं, जीवन संपलं: सडक अर्जुनीत मारुती कारवर झाड कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

कारवर झाड कोसळताच मागून येत असलेल्या टोयोटा कार चालकाचा स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने ती कारही रस्त्याच्या शेजारील दुसऱ्या झाडावर धडकली. ...वाचा सविस्तर
13:39 (IST) 9 Jul 2025

Yavatmal Rain News : यवतमाळ जिल्ह्यात १८ मंडळांत अतिवृष्टी; धरणं भरली, सायखेडा ओव्हरफ्लो

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा, चापडोह धरणाच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या धरणांमध्येही पाणीसाठा अपत्याचे वाढत आहे. ...सविस्तर वाचा
13:34 (IST) 9 Jul 2025

Nagpur Rain Updates : नागपूर ६० तास जलमय; मुसळधार पावसाने रचला नवा विक्रम!

जून महिना जवळजवळ कोरडाच गेला, पण जुलै महिन्यात पावसाने जोरदार सुरुवात केली.

सविस्तर वाचा...

13:29 (IST) 9 Jul 2025

चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत घोडेबाजार! सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, भाजप नेत्यांमध्ये चुरस

२१ संचालकांपैकी १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. आठ जागांसाठी गुरुवार, १० जुलैला मतदान होईल. ...सविस्तर बातमी
13:21 (IST) 9 Jul 2025

Hinganghat Rain News: हिंगणघाट पाण्यात! अनेक पुरात अडकले, सर्वाधिक रस्ते बंद, मात्र आमदार म्हणतात,,,

जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणतात की पावसामुळे सर्वाधिक हानी हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात झाली आहे. ...सविस्तर बातमी
13:17 (IST) 9 Jul 2025

Hinganghat Rain News: हिंगणघाट पाण्यात! अनेक पुरात अडकले, सर्वाधिक रस्ते बंद, मात्र आमदार म्हणतात,,,

वर्धा: दोन दिवसांतील पावसाचा सर्वाधिक फटका हिंगणघाट भागास बसला असून या भागातील असंख्य गावे ओलीचिंब झाल्याचे चित्र आहे. पूर नियंत्रण कामे नं झाल्याने अनेकांवर संकट ओढवले असून पुरात अडकलेल्या चार व्यक्तींना वाचविण्याचे कार्य युद्ध पातळीवर सूरू आहे. हिंगणघाट तालुक्यातील चानकी गावात चार व्यक्ती जीवन मरणाचा लढा देत आहे. बचाव पथक शर्थ करीत असल्याचे प्रशासन सांगते.

13:10 (IST) 9 Jul 2025

नागपुरात पाण्याच्या राजकारणाचे वर्तुळ पूर्ण

पाण्याचे राजकारण करू नये असे राजकारणातील जुने नेते सांगत असत. पण भारतीय जनता पक्षात नियम, संकेत, परंपरेला तेवढे स्थान नाही. ...सविस्तर बातमी
13:03 (IST) 9 Jul 2025

Nitin Gadkari National Highway: नितीन गडकरींच्या विभागाचा आणखी एक विक्रम! राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल ६ महिन्यांत खचला!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील उड्डाणपूल ६ महिन्यात खचला आहे.

सविस्तर वाचा...

13:02 (IST) 9 Jul 2025

CM Devendra Fadnavis on Nagpur Rain: नागरिकांनी काळजी घ्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नागपूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला.

सविस्तर वाचा...

Mumbai Nagpur Pune Breaking News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज ९ जुलै २०२५