नागपूर : जन्मदात्या वडिलाने आईकडून मुलाचा ताबा घेतल्यास त्याला अपहरण ठरवता येणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदवले. पालक या शब्दात अल्पवयीन मुलाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा समावेश होतो. त्यामुळे वडिलांनी आईकडून मुलाचा ताबा घेतल्यास त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.

हेही वाचा : “खोके आमदारांच्या मतदारसंघातच दुष्काळ जाहीर”, वडेट्टीवारांची टीका; म्हणाले…

हेही वाचा : अयोध्येतील राममंदिर लोकार्पण सोहळ्याचे विदर्भातील १५ लाख घरांना निमंत्रण, काय आहे विहिंपचा उपक्रम?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावतीमध्ये पती आणि पत्नीमध्ये वाद असल्याने दोघेही विभक्त झाले. वडिलांनी मुलाला आपल्याकडे ठेवले. यावर आईने अमरावती पोलिसात मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. अमरावती पोलिसांनी याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल केला. तो रद्द करण्यासाठी वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पालकत्व कायद्यानुसार वडील हे मुलाचे पहिले नैसर्गिक पालक असतात. वडिलानंतर मुलाच्या पालकत्वात आईचा क्रमांक लागतो, असा दावा याचिकेत केला गेला. मुलगा आईकडून वडिलांकडे जाणे एका पालकाकडून दुसऱ्या पालकाच्या ताब्यात जाणे असे होईल. त्यामुळे वडिलांवर गुन्हा दाखल करणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्यासारखे होईल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.