नागपूर : राहुल गांधी यांना संविधान किंवा आदिवासी विषयी काहीही माहिती नसून ते जनतेमध्ये खोटी माहिती पसरवत आहेत. त्यांच्याकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असले तरी अजुनही ते अपरिपक्व नेते असल्याची टीका केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी केली.

संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने नागपुरात आले असता ते प्रसार माध्यामांशी बोलत होते. आरक्षणाला पं. नेहरुनी आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांनी विरोधी केला आहे आणि राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षणाची गरज नसल्याचे सांगत आहे. राहुल गांधी यांना संविधानात काय आहे हे अजुनही माहिती नाही. आदिवासी दलित जनतेची ते दिशाभूल करत आहे. काँग्रेस ही खोटे आश्वासन देणारी आणि जनतेचा विश्वासघात करणारी फॅक्टरी आहे अशी टीका त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात जास्त अपमान काँग्रेसने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधानाच्या नावावर नेरेटीव्ह पसरविण्यात आला मात्र आदिवासी व दलित समाजाला काँग्रेसचा हा डाव कळला आहे. अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात काँग्रेसवर नाराज काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचे रिजिजू म्हणाले.

हेही वाचा : “धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेक़डून प्रतिसाद मिळत आहे. विशेषत:) सरकारने राबविलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीने मात्र या योजनेला विरोध केला असताना आजा जाहिरनाम्यात ३ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसचा जाहिरनामा हा खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा जाहीरनामा असल्याची टीका त्यांनी केली.

नुकत्याच झालेल्या नागपुरातील सभेत राहुल गांधी संबोधित करताना त्यावेळी संविधानाच्या आतील पाने कोरी असलेल्या प्रती वाटण्यात आल्या. यामुळे त्याचा आणखी पर्दाफाश झाला असल्याचे रिजिजू म्हणाले. भाजपला संविधान बदलून आरक्षण संपवायचे आहे, असा आरोप करताना गांधी अनेकदा संविधानाची प्रत दाखवतात. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते (लोकसभेतील) संवैधानिक पद असल्याने मी त्यांचा आदर करतो. तथापि, राजकीय दृष्टिकोनातून, ते अपरिपक्वता दाखवतात. इंडिया आघाडीने त्यांना विरोधी पक्ष नेते केले परंतु अद्याप त्यांच्याकडे परिपक्वता नाही. जो पर्यंत राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे तो पर्यंत विरोधी पक्ष सक्षम होऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा : चंद्रपूर : काँग्रेस नेते नरेश पुगलिया व भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार एकाच मंचावर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या अनेक ‘बनावट आख्यायिका’ आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात गेल्या अडीच वर्षात अनेक योजना राबविण्यात आल्या आणि त्याचा लाभ विविध जाती धर्मातील लोकांनी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका महायुती आरामात जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.