गोरेवाडा, फुटाळा तलाव ‘ओव्हरफ्लो’, शाळांना सुटी जाहीर

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण नागपूर जिल्हा संततधारेमुळे जलमय झाला आहे शिवमंदिर कोसळल्याने सहा जण जखमी झाले. गोरेवाडा तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला असून प्रकल्पाचे दरवाजे खुले करण्यात आले आहे. फुटाळा तलावंदेखील ‘ओव्हरफ्लो’ झाला असून फुटाळा चौपाटीवर पाणी आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भालदारपुरा परिसरातील शिवमंदिर पावसामुळे कोसळले. ,या घटनेत सहा जण जखमी झाले. त्यात एका चिमुरडीचा समावेश आहे. जखमीना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आला आहे.शहरातील अनेक सखल भागात तसेच अनेक वस्त्यांमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. लगतचा कुही तालुका जलमय झाला असून शेतीत पाणी साचले आहे. मौदा तालुक्यातील झोपडपट्टी भागात पाणी शिरले आहे. पावसामुळे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नारायणा, स्कुल ऑफ स्कॉलर, डीपीएस, सोमलवार आदी शाळांना सुटी देण्यात आली आहे. भालदारपुऱ्यातील घटनेत सहा जण जखमी त्यात एका चिमुरडीचा समावेश आहे. जखमीना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आला आहे.