चंद्रपूर : शहरात शनिवारी गणेश विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.शहरातील मुख्य मार्गाने विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर नाचत गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
ही विसर्जन मिरवणूक भारतीय जनता पार्टीच्या पंडालासमोर आल्यावर तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना नाचण्याच्या मोह आवरता आला नाही आणि मुनगंटीवार थेट कार्यकर्त्यांमध्ये उतरून डीजेच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या नृत्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीनच दुणावला आणि परिसर जल्लोषात निनादला.
आमदार सुधीर मुनगंटीवार यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेhttps://t.co/2jrmCKw8Ui@SMungantiwar pic.twitter.com/ruSoPAM4JY
— LoksattaLive (@LoksattaLive) September 7, 2025
आमदार सुधीर मुनगंटीवार यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेश मंडळाचे स्वागत करीत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत मंडपातून खाली उतरत गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासोबत डान्स केला. मुनगंटीवार स्वतः डान्स करीत असल्याचे बघून कार्यकर्ते देखील नाचायला लागले. बाप बाप रहेगा या गाण्यावर मुनगंटीवार यांनी हा डान्स धमाका केला. त्यांच्यातील उत्साह बघण्यासारखा होता.