लोकसत्ता टीम

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्या चारचाकी वाहनाची तपासणी केल्याची माहिती आहे. या वाहनात बऱ्याच धक्कादायक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे.

Eknath shinde ajit pawar (2)
ShivSena vs NCP : “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
man killed his girlfriend and buried body in forest of Ramtek
धक्कादायक! प्रेयसीचा खून करून रामटेकच्या जंगलात मृतदेह पुरला; प्रियकराला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Ten accused who blocked vehicles on the highway and committed robberies arrested in Chhattisgarh
वर्धा: सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार हे ऑडी कारने काचीपुरा चौकातून अनियंत्रित गतीने जात होते. सेंट्रल पॉईट हॉटेलसमोर त्यांनी एका कारला धडक दिली. ती धडक एवढी भयंकर होती की ऑडी कारचाही समोरचा भाग चक्काचूर झाला तर धडक बसलेल्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघाताचा सर्व थरार दर्शवणारे सीसीटीव्ही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. ही माहिती कळल्यावर सोमवारी नागपुरातील शहर आरटीओचे अधिकारी अपघातग्रस्त वाहनाची तपासणी करायला गेले. त्यांनी प्राथमिक निरीक्षण केले. निरीक्षणानंतर आरटीओच्या अधिकऱ्यांनी नागपूर पोलिसांनी या अपघाताबाबत शासकीय यंत्रणेच्या इंटिग्रेटेड रोड एक्सिडेंट डेटा (आय रेड) या संकेतस्थळावर टाकले काय? हे तपासले. परंतु, त्यावर त्यांना माहिती आढळली नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला या अपघात करणाऱ्या चारचाकी वाहनाच्या निरीक्षणाचा सूक्ष्म निरीक्षण अहवाल त्यावर टाकता आला नाही.

आणखी वाचा-नागपूर : लाडक्या बहिणींच्या समितीवर सर्वच भाऊ

दुसऱ्या दिवशी मंगळवारीही आरटीओकडून या संकेतस्थळावर पोलिसांकडून माहिती अपलोड केली काय? हे बघण्यात आले. ही माहिती दुपारनंतर टाकल्याचे पुढे आल्यावर आरटीओकडून अपघाताचा अहवाल टाकण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. त्यामुळे आरटीओचे अधिकारी या अहवालात काय माहिती देणार? त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच सातत्याने या प्रकरणात शासकीय यंत्रणेकडून माहिती दडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे आरटीओकडूनही या पद्धतीचे प्रयत्न होणार काय? हाही प्रश्न विरोधकांकडूनच उपस्थित केला जात आहे.

अपघाताचा अहवाल टाकायला पोलिसांकडून विलंब का?

नागपूर शहर पोलिसांकडून एखादा अपघात झाल्यावर शासनाच्या आय रेड या संकेतस्थळावर तातडीने अपघाताच्या माहितीसह संबंधित वाहनाचा क्रमांवर व त्यावरील प्राथमिक माहिती अपलोड केली जाते. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांकडूनही अपघाताचे निरीक्षण करून या अपघाताचे कारण व इतर अंदाज वर्तवले जातात. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाल्यावरही सोमवारी दिवसभरात पोलिसांनी ही माहिती का टाकली नाही? त्यामागेही काही कारण आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.