नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या राष्ट्रीय चिंतन शिबिराला आज थोड्याच वेळात सुरुवात होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आणि वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व खासदार सुमित्रा पवार संबोधित करणार आहेत.

या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे त्यापूर्वी पक्षाचे धोरण पर्यावरण भूमिका युवकांबद्दल भूमिका कृषीविषयक भूमिका सांस्कृतिक भूमिका अशा विविध विषयावर विचार मंथन केले जाणार आहे वेगवेगळ्या विषयांवर पक्षाचे वरिष्ठ नेते पक्षाचे वरिष्ठ दहा नेते यांचे प्रबोधन होणार आहे यामध्ये खासदार सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष खालील समिती राष्ट्रीय भूमिका आणि निवडणूक रणनीती यावर विचारमंथन करेल. या शिबिरात खालील विषयावर वेगवेगळ्या समितीचे अध्यक्ष विचार मंथन करणार आहेत.

१. दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिवनेरी समिती — संविधान, लोकशाही आणि संघराज्यव्यवस्था यावर विचारमंथन करेल.

२. नारहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालील रायगड समिती — सामाजिक न्याय आणि समावेशक राजकारण यावर विचारमंथन करेल.

३. अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील कळसुबाई समिती — महिलांचा सशक्तीकरण आणि लिंग समता यावर विचारमंथन करेल.

४. इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखालील विजयदुर्ग समिती — युवक, विद्यार्थी आणि भविष्यातील नेतृत्व यावर विचारमंथन करेल.

५. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील पन्हाळा समिती — शेती आणि शेतकऱ्यांचे हक्क यावर विचारमंथन करेल.

६. अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखालील राजगड समिती — सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यावर विचारमंथन करेल.

७. अनिल भायदास पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अजिंक्यतारा समिती — अर्थव्यवस्था, उद्योग आणि रोजगार यावर विचारमंथन करेल.

८. नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालील देवगिरी समिती — शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि हवामान बदल यावर विचारमंथन करेल.

९. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील रामटेक समिती — संघटन, प्रवक्ते आणि संवाद यावर विचारमंथन करेल.

१०.सूनित्रा पवार यांच्या अध्यक्षतेखालील सिंहगड समिती — राष्ट्रीय भूमिका आणि निवडणूक रणनीती यावर विचारमंथन करेल.

हे शिबीर एम्प्रेस पॅलेस, वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन केले जाणार आहे. पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर सखोल चर्चा होणार आहे.या चिंतन शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीचा आढावा घेण्यात येईल. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगामी निवडणुकांमध्ये यश कसे मिळवायचे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

शिबिरात या मुद्यांवर चिंतन केले जाणार आहे.युवकांचे बदलते आकांक्षा आणि जीवनशैली, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा, तंत्रज्ञान आणि समाज यांचा परस्पर संबंध, शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कामगार वर्गाचे हित,पक्षाची विचारसरणी गावागावात पोहोचवण्याचे धोरण, या शिबिरात पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी-माजी आमदार व खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. हे शिबीर शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित प्रगत महाराष्ट्र घडवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.