नागपूर – दगडफेक हा तसा हिंसक प्रकार, विदर्भातील ग्रामीण बोलीत त्याला ‘गोटमार’ म्हणतात. परस्परांवर दगडफेकणे हा तसा कायद्यान्वये गुन्हाही.पण नागपूरला खेटून असलेल्या, पूर्वी विदर्भात असलेल्या पण नंतर मध्यप्रदेशमध्ये असलेल्या पांढुर्णा या गावात ही दगडफेकच एक परंपरा आहे. दर वर्षी पोळ्याला परस्परांवर दगडफेकले जातात.

ही जवळपास 400 वर्षे जुनी परंपरा आहे. दरवर्षी भाद्र पक्षातील अमावस्या तिथीला पांढुर्णा येथील जाम नदीवर पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी असते. पोळा सणात बैलांची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पांढुर्णा आणि सौंसर गावातील लोक दिवसभर एकमेकांवर दगडांचा वर्षाव करतात. ज्यामध्ये शेकडो लोक जखमी होतात आणि काहींना प्राणही गमवावे लागतात. दगडफेकीच्या परंपरेला प्रेम कहानीची पार्श्वभूमी आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हायची होती तेव्हा वऱ्हाड प्रांत होता. त्याला सीपी ॲण्ड बेरार प्रांत असे नाव होते.नागपूर ही या प्रांताची राजधानी होती. पांढुर्णा हे मराठी भाषिकांच्या लोकवस्तीचे गाव आणि कापसाच्या व्यापारपेठ. भाषारचनेच्या आधारावर १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा पांढुर्णा हे मध्यप्रदेशमध्ये गेले. पण त्याचा नागपूरशी कनेक्ट कायम आहे. याच पांढुर्ण्यात व लगतच्या सावरगाव येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याला गोटमार म्हणजे दगडफेक करण्याची जीवघेणी परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. याचनिमित्ताने एकमेकांवर तुफान दगडफेक करणारे लोक यंदाही महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील पांढुर्णा येथे दिसले. याला गोटमार यात्रा असं म्हटलं जातं. नदी पात्रातील झेंडा उचलण्यासाठी ही स्पर्धा असते.

एका प्रेमी युगुलाला विरोध म्हणून जाम नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावकर्‍यांमध्ये दगडफेक झाली. त्याचं स्मरण म्हणून ही धोंडाफेक केली जाते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तर जुन्या काळात पेंढारी लोकांना शह देण्याकरिता गावकर्‍यांनी केलेल्या गोटमाराची आठवण यानिमित्ताने जागवली जात असल्याचंही सांगितलं जाते. तेव्हापासून येथे पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी ही ऐतिहासिक गोटमार (दगडफेक) करण्याचा येथील नागरिकांचा प्रघात आहे.

नागपूरातील प्रियकरानं तब्बल… गोटमार परंपरा वर्षानुवर्षे पाळली जात आहे. दरम्यान एकमेकांवर दगडफेक करण्याचा हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले, मात्र आतापर्यंत प्रत्येक प्रयत्न फसला आहे. दगडांचा पाऊस थांबवण्यासाठी रबर बॉलने खेळ आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्रयत्न काही मिनिटांतच उधळला गेला. गेल्या चार वर्षांपासून गोटमार बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, हे प्रकरण मानवी हक्क आयोगापर्यंत पोहोचले. गोटमार यात्रेचा उपक्रम रोखण्यासाठी प्रशासनाची कडक तयारी होती, मात्र गोटमार परंपरा थांबवण्याचे प्रयत्न फसले.

यंदा ५०० लोक जखमी

पांढुर्णा येथील पारंपारिक गोटमार उत्सवात शनिवारी सुमारे ५०० लोक जखमी झाले. सकाळी दहा वाजतापासून दगडफेक उत्सवाला सुरूवात झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही इस साल भी गोटमार मेले पर मेले की आराध्य देवी चंडिका के मंदिर में हजारों गोटमार मेळाव्यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. चंडिका देवीच्या दर्शनानंतर गोटमारीला सुरूवात झाली. विशेष म्हणजे पांढुर्णा पोलीसांचा सहाशे जवान येथे तैनात होते. यात जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात होत्या हे विशेष.