भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्याच्या लॉकडाउन काळात आपल्या मुंबईच्या घरात राहत आहेत. लॉकडाउन काळात विराट-अनुष्का सोशल मीडियावर विविध प्रकारे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनुष्का शर्माने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, I spotted …. A Dinosaur on the loose अशी कॅप्शन देत विराटचा डायनॉसोर स्टाईलमध्ये चालताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अनुष्काच्या या व्हिडीओला दिवसभरात नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या ट्विटर हँडलने अनुष्काच्या या व्हिडीओवर एक भन्नाट कमेंट करत सर्वांची मनं जिंकून घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवघ्या काही मिनीटांमध्ये अनुष्काच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या घरातल्या बाल्कनीत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.