नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांना लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून त्यांना लाखो रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्या विरोधात आहे. धवनकर यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. नुकत्याच झालेल्या विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकी दरम्यान तक्रारकर्त्या एका प्राध्यापकाच्या पत्नीने धवनकरांच्या कानशिलात हाणली होती.

त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र या गंभीर प्रकारानंतरही धवनकर यांनी अद्यापही आपले स्पष्टीकरण विद्यापीठाला सादर केले नसून एक प्रकारे आव्हान देत असल्याची चर्चा आहे. शिवाय राजकीय दबाव आणून प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.विद्यापीठाच्या अधिसभेतील प्राचार्य, विद्यापीठ शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक, महाविद्यालय व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेच्या शिक्षक प्रवर्गातील जागांसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठ शिक्षक प्रवर्गासाठी विधी महाविद्यालयात मतदान केंद्र ठरविण्यात आले होते.

हेही वाचा: नागपूर: खंडणीच्या आरोपानंतर धवनकरांनी दिले माध्यमातील ‘मूल्यां’चे शिक्षण, काही घडलेच नसल्याचा आव आणत घेतला दोन तासांचा वर्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास या प्रवर्गातील उमेदवार आणि मतदानासाठी आलेले मतदार उपस्थित असताना डॉ. धवनकरांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या एका विभागप्रमुखांची पत्नीही या केंद्रावर आली. त्यांनी डॉ. धवनकरांना बघताच, त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्या कानशिलात लगावली. होती. हा प्रकार बघून आसपासचे सर्वच अवाक झाले. त्यानंतर धवनकरांनी उपस्थित एका प्राध्यापकाच्या पाया पडत मला वाचवा, मला वाचवा म्हणून धावा केला. काहींनी यात मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. मात्र, यामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला प्रचंड धक्का बसला आहे. असे असले तरी राजकीय दबाव आणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.