चंद्रपूर : राज्यातील भाजपा, शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तीन इंजिनच्या सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर जाती जातीत, समाजा समाजात विष कालवण्याचे व भांडणे लावण्याचे काम सुरू केले असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. चिमूर येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचे हात मजबूत करा, तरच लोकशाही टिकून राहील.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टिवार, विशेष अतिथी म्हणून विधानपरिषद आमदार ॲड. अभिजीत वंजारी, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले, प्रदेश कांग्रेस समितीचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जि. प. अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुकर, उपस्थित होते.

हेही वाचा – गडकरी आता जुने जोडे-चप्पल गोळा करणार, योजना काय वाचा..

नाना पटोले पुढे म्हणाले की, देशात लोकशाही, संविधान, धोक्यात आहे. पंतप्रधान हे व्यापार करित असल्याने मुठभर श्रीमंत व्यापारी यांना मोठा लाभ होण्यासाठी सामान्य शेतकरी, नागरिक यांची आर्थिक लूट करित आहेत. आज हुकूमशाहीचे राज्य सुरू आहे. लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेसचे हात मजबूत करण्याची वेळ आहे. येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसला विजयी करा, अन्यथा देशात हुकूमशाही लागू झाल्याशिवाय राहणार नाही, असे विचार व्यक्त केले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टिवार उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, चिमूर विधानसभा क्षेत्रातूनच नव्हे तर चंद्रपूर-गडचिरोली जिल्हयातूनसुद्धा कांग्रेस उमेदवारांना विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी केल्याशिवाय राहणार नाही. सरकार आरक्षणाच्या नावावर जाती-जातींमध्ये, समाजा- समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करित आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व हेवेदावे विसरून कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन स्थानिक आमदार व खासदार यांचा पराभव केल्याशिवाय राहणार, नाही असे प्रतिपादन केले.

हेही वाचा – नागपूर : बेरोजगार तरुणांना रोजगार.. ‘इंडस्ट्री मिट’ आज..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी विजय गावंडे, विनोद बोरकर, प्रणय गड्मवार, अनमोल शेन्डे, विलास डांगे, गजानन बुटके, धनराज मुंगले, राम राऊत, डॉ. सतिश वारजुरकर, बंटी शेळके, डॉ. अविनाश वारजुरकर, बाळ कुळकर्णी, आमदार अभिजीत वंजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्ताधारी आमदार व काही अधिकारी वर्गावर जोरदार फटकेबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय गावंडे, संचालन सौ. सुवर्णा ढाकूनकर आभार विजय डाबरे यांनी मानले.