बुलढाणा : जळगाव जामोद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्यावतीने आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळी दिवाळी साजरी करण्यात आली. अस्मानी, सुलतानीमुळे कृषीप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असल्याने हतबल बळीराजाच्या प्रती संवेदनशीलता दर्शविण्यासाठी चटणी, भाकर आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करण्यात आली.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत व संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे वचन शासनाने पाळले नाही. यामुळे शासनाच्या विरोधात चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष अडव्होकेट प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात आज २१ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक तहसील कार्यालया समोर जळगांव जामोद येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन तथा शासनाच्या विरोधात घोषणा देऊन शासन, प्रशासनाचा निषेध करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव,
तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.डी. साबीर, शहराध्यक्ष ईरफान खान, महादेव भालतडक, सिद्धार्थ हेलोडे, विठ्ठल वाघ, शेख जावेद, ऍड.करीम खान, ऍड.मोहसीन खान,संजय ढगे, संतोष जवरे,एजाज देशमुख, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, विठ्ठल घुले, एकनाथ ताठे,अरुण कोकाटे, कैलास मानकर, शेख जाकीर, सतिष तायडे, पंजाब वाघ, योगेश झाटे, रोहित पवार,योगेश कुवर,आकाश जाणे,शशिकांत मिसाळ,शकील पिंजारी,अतुल मानकर, एकनाथ गटमने,ओम देशमुख,राहुल तायडे, फुरखान खान,रेहान एम.डि,सागर हेलोडे, अंकित हेलोडे, संदीप थोर, अक्षय रायपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कधी नव्हे तो धो धो पाऊस यावर्षी झाला. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. बळीराजाच्या हात- तोंडाशी आलेला घास त्याच्या देखत हिरावून गेला. सगळं होत्याचं नव्हतं झालं. शेतातील कापणीला आलेलं उभपिकच वाहून नाही गेलं तर, गुरे ढोरे ,गोठे शेती साहित्य, शेतातील विहिरी, शेतातील सुपीक माती हे सर्व आलेला पुरात उध्वस्त करून घेतो.
या आलेल्या संकटातून बळीराजाला मायबाप शासनाने उभारी देणे गरजेचे होतं. आमच्या पक्षाकडून देखील केंद्रातील व राज्यातील शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनी व वाहून गेलेले शेतीसाहित्य, गुरेढोरे यांचा पंचनामा करून त्यांना वेगळी मदत द्यावी. निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी, आम्ही सत्तेत येताच शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करू, हे आश्वासन दिले होते, ते त्यांनी तत्काळ पूर्ण करावे. हेक्टरी १८ हजार ५०० रुपये अनुदान जाहीर केलेलं असताना एकरी फक्त २ हजार रुपये वाटप चालू आहे. फडणवीसांनी ही शेतकऱ्याची थट्टा त्वरित थांबवावी व जाहिर केल्याप्रमाणे मदत सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी इत्यादी मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
शासनाने तात्काळ मंजूर कराव्यात म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विविध स्तरावर लढे उभारले. महायुती शासन देखील या रास्त मागण्या तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना या संकटातून उभारी देण्यासाठी हातभार लावेल असं सर्वांनाच वाटत होतं. परंतु शासनाने ओला दुष्काळाच्या नावाने थातूरमातूर पॅकेज घोषित करून शेतकऱ्याला वाटाण्याच्या अक्षता देण्याचं काम केलं. शिवाय शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत आहे. राज्यातील संपूर्ण शेतकरी उध्वस्त झाला आहे.
बँकेचे कर्ज, उसनवारी, मुलांचे शिक्षण, घरचा खर्च व खरडून गेलेली शेती कशी परत सुपीक करावी आणि रब्बी पिकाची पेरणी कशी करावी या विवांचनेत आहे. आज राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत असताना दुसरीकडे मात्र सरकार अनाठाई तिजोरी खर्च करीत आहेत. शक्ती महामार्गाच्या सारखे अनावश्यक प्रकल्प आणून त्यातून मलिदा लाटीत आहे. हे असं झालं सरकार तुपाशी ,जनता मात्र उपाशी. शेतकऱ्यांना कुठेही मार्ग दिसत नाही संपूर्ण काळोख त्यांच्यापुढे पसरला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी ही शासनाच्या लबाड धोरणामुळे काळी दिवाळी झाली आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील म्हनाले की, आम्ही आज महायुती शासनाचा बळीराजापती असलेल्या लबाड धरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या समावेत चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करत आहोत. शासनाचा तीव्र निषेध करीत आहोत. शासनाने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे. संपूर्ण सातबारा कोरा करण्याची तात्काळ घोषणा करावी, २०२४चा खरीप पिकवीमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा अन्यथा आम्हाला शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी तीव्र लढे उभे करावे लागतील व याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची असेल असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.