scorecardresearch

नागपूर : राष्ट्रवादीची जनजागरण यात्रा, ‘हमे तो लूट लिया’ म्हणत माजी आमदाराची मोदींवर टीका

राष्ट्रवादीची जनजागरण यात्रा सोमवारी नागपुरात पोहोचली. या निमित्ताने ठिकठिकाणी सभा झाल्या.

NCP Jan Jagaran Yatra nagpur
राष्ट्रवादीची जनजागरण यात्रा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : देशातील सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांना विकणे, बेरोजगारी या मुद्यांवरून विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. गौतम अदाणीच्या प्रकरणावरून मोदी सरकारची कोंडी करण्याचे त्यांचे प्रयत्न आहे. राष्ट्रवादीची जनजागरण यात्रा सोमवारी नागपुरात पोहोचली. या निमित्ताने ठिकठिकाणी सभा झाल्या. त्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर प्रखर टीका करण्यात आली.

हेही वाचा – चंद्रपूर : विद्युत प्रवाहाचा स्पर्श की शिकार? नांदगाव येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू

हेही वाचा – नागपूर: तांबे प्रकरणाने पक्ष कमजोर झाला – सुनील केदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी तर एका हिंदी गाण्याच्या तालावर एक गीत सादर करून मोदी सरकार टीका केली. मोदी सार्वजनिक उपक्रमातील कंपन्या विकत असून देशाला अधोगतीकडे नेत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले “हमे तो लुट लिए चड्डी वालोने.. सफेद दाढी वालोने, भगव्या जॅकेट वालोने..”

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:05 IST
ताज्या बातम्या