भंडारा : एकीकडे राज्यात सर्वत्र महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी महायुतीतील तीनही पक्षांचे नेते एकत्र येत असून जागा वाटपात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे मात्र भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. तीनही पक्षाचे प्रमुख एकत्रितपणे हा निर्णय घेतील असे बोलतानाच भंडारा-गोंदिया मतदार संघातून लढण्याचा निर्णय घेतल्यास आम्हाला तयारीची गरज नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे या मतदासंघावर आता अजित पवार गट दावा ठोकणार का अशा चर्चांना ऊत आलेला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, भंडारा गोंदिया मतदारसंघातून मी अनेक वर्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिली आहे. आमचा पक्ष विदर्भात विशेषतः भंडारा गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक बळकट आहे. त्यामुळे ती जागा आणि मागितल्यास त्यात काहीच वावगे ठरणार नाही. शिवाय या मतदार संघात मी अनेक कामे केली आहेत, प्रतिनिधीत्व केलंय त्यामुळे माझ्या तयारीचा प्रश्नच उरत नाही. मी सदैव तयार असतो. विदर्भात आम्हाला जागा हव्या आहेत असेही ते म्हणाले.

हेही वाचा : आंभोरा ब्रिजवर अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेटच्या ब्रिजची प्रतिकृती, पुलावरच ४० फूट उंचीवर ‘स्काय गॅलरी’; आज लोकार्पण

लोकसभेचे जागा वाटप भाजपच्या नेतृत्त्वात होणार आहे. भाजपचे जास्त खासदार आणि आमदार आहेत त्यामुळे साहजिक लोकसभेसाठी त्यांचा मोठा दावा असणार आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, भंडारा जिल्हा मतदारसंघ आणि माझं नातं वेगळा आहे. विदर्भात सगळ्यात बळकट राष्ट्रवादी ही गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ही राष्ट्रवादीला मिळणे अपेक्षित आहे. मी भंडारा- गोंदियासाठी आग्रह केलेला नाही पण जेव्हा तयारीची गोष्ट करता ३६५ दिवस गोंदिया -भंडाऱ्याच्या संपर्कात असतो. त्यामुळे त्यासाठी मला वेगळं काम करण्याची गरज नाही.

हेही वाचा : काँग्रेसची विभागीय बैठक गडचिरोलीत; प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला राहणार उपस्थित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार अपात्रता निर्णयावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, ही एक न्यायीक प्रक्रिया आहे. निवडणूक कोर्ट हे सुद्धा ज्यूडिशीअल प्रक्रिया आहे. त्या निर्णयावर भाष्य करणे टीका करणे हे योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल विधानसभा अध्यक्षांनी द्यावा असं सांगितलं. याचा अर्थ अधिकार विधासनभा अध्यक्षांकडे हे अधिकार असल्याचे सु्प्रीम कोर्टाला मान्य आहे. अजित पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावे. हा निर्णय पक्षात आलेले पदाधिकारी आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी बहुमतांनी निर्णय घेतला. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आमची याचिका दाखल केली. आमची आणि शिंदे यांची केस वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या महिन्यात येऊन गेले होते. लोकसभा आणि विकासकामांचे काही संबंध नाही. विकासकाम एका दिवसांत होत नाही, तर यासाठी वर्ष लागतात. तरुण पिढीला यात रोजगार पाहिजे त्यासाठी काम होत आहे, असे देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले.