नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. नागपुरातील हलबा महासंघाच्या कार्यक्रमात त्यांनी शनिवारी (२० सप्टेंबर २०२५) मराठा आणि ब्राम्हण समाजाबाबत महत्वाचे विधान केले. नितीन गडकरी गडकरी नेमके काय म्हणाले त्याबाबत आपण जाणून घेऊ या. नितीन गडकरी म्हणाले, मी ब्राम्हण जातीचा आहे. परमेश्वराचे माझ्यावर एक उपकार आहे. आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राम्हण समाजाला महत्व नाही.
परंतु उत्तर प्रदेश, बिहारमध्ये खूप महत्व आह. तेथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा हे सर्वच क्षेत्रात शक्तीशाली आहेत. महाराष्ट्रात जसे मराठा तसेच तेथे ब्राम्हण शक्तीशाली आहे. परंतु मी जात- पात मानत नाही. मानूस हा जात- पातीने नव्हे तर कर्तुत्वाने मोठा होतो. त्या जोरावरच मानूस ओळखला जायला हवा. हलबा समाजातील मुलांनाही चांगले शिक्षण, आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीत पुढे यायला हवे. त्यासाठी बरेच समाजातील प्रतिष्ठित लोक काम करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
अभिनेत्री हेमा मालिनी हातमागाची साडी घालून रॅम्पवर…
हलबा समाज हातमाग व पावरलुमच्या साड्यांसाठी प्रसिद्ध होते. ही ओळख पून्हा निर्माण करण्यासाठी धापेवाडा येथे धापेवाडा टेक्सटाईल नावाने हातमाग व पाॅवरलूमचा कारखान्यावर काम सुरू आहे. येथे तयार साड्यांवर झारखंड येथे प्रिंटचे काम केले गेले. त्यामुळे ही साडी इतकी सुंदर झाली की त्याला सर्वत्र मागणी वाढली आहे. सध्या साड्यांसाठी प्रतिक्षा यादी आहे. दरम्यान धापेवाडातील टेक्सटाईल्सची वास्तू सुमारे सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. येते कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना आणण्याबाबत बोलने झाले आहे.
येथे येतांना हेमा मालिनी यांना धाडेवाडात तयार साडी परिधान करूनच यायला सांगितले आहे. त्यांनी याबाबत कबूलीही दिली आहे. हेमा मालिनी येथील साडीवर आल्यास आपोवार या साडीची मार्केटिंग होईल, असेही गडकरी म्हणाले. या साडीची किंमत बाहेर दोन ते तीन हजार रुपये आहे. परंतु ही साडी गरीब व मध्यमवर्गीय महिलांना केवळ ४०० रुपयांत उपलब्ध केली जाईल. त्यातही विनकरीचे काम करणाऱ्या महिलेला ६० रूपये प्रति साडी मजूरी, १० रुपये ट्रस्टच्या खात्यात जाईल. या प्रकल्पामुळे पून्हा नागपूरसह विदर्भाला सूती हातमाग व पाॅवरलूम साडीची ओळक देण्याचा प्रयत्न असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.