नागपूर – देशात हळूहळू गरिबांची संख्या वाढत चालली असून श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती चालली आहे. संपत्तीचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूरमध्ये सी.ए. विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना गडकरी बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था, संपत्तीचे मोजक्याच श्रीमंत व्यक्तीकडे होत चाललेले केंद्रीकरण यामुद्यावर गडकरी यांनी या परिषदेत बोट ठेवले. हळूहळू गरीब वाढत चालले आहे आणि श्रीमंत लोकांच्या हाती संपत्तीचे केद्रीकरण होत चालले आहे..लोक आता प्रश्न करतात की की, आपल्या विकासाठी आर्थिक चिंतनाची गरज आहे. अमेरिकेने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. पण ते मॉडेल अयशस्वी ठरले आहे. आपल्या देशातही ही चर्चा आहे की, आपण काय करायला हवे.? आपले उदिष्ट गरिबांची गरीबी दूर करणारा, तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणारा, देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आपल्याला हवा आहे. त्यामुळे सहाजिकच नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी उदरमतदावाचे धोरण स्वीकारले. पण आपल्याला विचार करावा लागेल की अर्थव्यवस्थेचे क्रेंद्रीकरण होता कामा नये, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली.
जीडीपीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान समान नाही, उत्पादन क्षेत्राचा वाटा २२ ते २४ टक्के, सेवा क्षेत्राचा ५२ ते ५४ टक्के, कृषी क्षेत्राचा वाटा फक्त१२ टक्के अहे. यात ६५ ते ७० टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे., असे गडकरी म्हणाले. देशाच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल होत आहेत. त्यात सी.ए.ची भूमिका महत्वाची आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले