नागपूर : मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळी याला उच्च न्यायालयाने संचित रजा (फर्लो) मंजूर केली असून आता डॉन २८ दिवस पुन्हा कारागृहाबाहेर येणार आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वाल्मिकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुख्यात गुंड आणि जन्मठेपेचा आरोपी असलेल्या अरुण गवळी याने संचित रजा (फरलो) मिळावी म्हणून नागपूर कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. मात्र, अरुण गवळी यांना संचित रजा दिल्यास मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण होऊ शकते, असे गृहित धरले आणि गवळी याचा सुटीचा अर्ज नामंजूर केला. त्यावर गवळीचा आक्षेप होता. कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा करीत गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

हेही वाचा – पेपरफुटीप्रकरणी सरकारला न्यायालयात आव्हान

हेही वाचा – Weather Update: विदर्भ वगळता राज्यात दोन दिवस पावसाचे

उच्च न्यायालयाने कारागृह उपमहानिरीक्षकांना नोटीस बजावली होती. शेवटी डॉन गवळी याला २८ दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात यावी, असा निर्णय न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिला. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याकांडात डॉन अरुण गवळी हा मुख्य आरोपी म्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यापूर्वी गवळी याला अनेकदा सुटी देण्यात आली होती. सुटी संपल्यानंतर तो स्वत:हून नागपूर कारागृहात हजर झाला होता, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notorious don arun gawli is out of jail once again gawli got leave adk 83 ssb
First published on: 27-09-2023 at 09:20 IST