नागपूर : पंकजा मुंडे यांच्या मनात स्थानिक नेत्याबाबत दुःख आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या मोदी आणि शहा यांना भेटणार आहे हा योग्य मार्ग आहे. त्या राष्ट्रवादीत येणार का याची मला कल्पना नाही त्या येतील अस वाटत नाही. मात्र भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

ओबीसी मेळावाच्या निमित्ताने छगन भुजबळ नागपुरात आले असता ते बोलत होते. भाजपवर मोठ्या प्रमाणात ओबीसी नाराज आहे यावर भाजपने विचार करायला पाहिजे.ओबीसी डावलले जात असल्याचे लक्षात येताच भाजपने  बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केले असेही ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीने मुंबई पलिका लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक पक्ष आपली तयारी करणारच आम्ही देखील आपली तयारी करत आहे, असेही भुजबळ म्हणाले. संजय राऊत यांच्या बद्दल मी बोलणे योग्य नाही त्यांनी स्टॅलिन सोबत का तुलना केली हे माहिती नाही. याबाबत त्यांनाच विचारा. प्रत्येक नेत्यांनी टीका करताना मर्यादा सांभाळून बोलले पाहिजे.

हेही वाचा >>> दुर्दैवी! नाकाला चिमटा लावला अन् चिमुकलीचा गुदमरून जीव गेला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत एकत्र असताना एकमेकांवर शेरेबाजी करणं टाळलं पाहिजे अश्याने वज्रमूठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत आपल्याकडे फक्त ४८ जागा आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करू नये. वरिष्ठ नेते सूत्र ठरवून जागा वाटप करतील. होर्डिंग्जच्या माध्यमातून कार्यकर्ते उत्साह दाखवितात. अशा होर्डिंग्जने फायदा तर नाही पण अनेक वेळा नुकसान होते कारण त्यांचे पाय खेचले जातात असेही भुजबळ म्हणाले.