नागपूर: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोठी चढ- उतार बघायला मिळत आहे. मध्यंतरी नागपुरात हे दर प्रति दहा ग्राम ६२ हजार रुपयांच्या जवळपास गेले होते. परंतु या दरात मंगळवारी (७ नोव्हेंबर) घसरण होऊन हे दर ६१ हजार रुपये नोंदवले गेले.

नागपुरातील सराफा बाजारात ७ नोव्हेंबरच्या सकाळी १०.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६१ हजार रुपये, २२ कॅरेटचे दर ५८ हजार रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७२ हजार ६०० रुपये होते.

हेही वाचा… बुलढाणा: जिल्हा परिषद शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; बालाजी मंदिरानजीक वाहनात केले दुष्कर्म

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे दर ३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६१ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५८ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४९ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार १०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७३ जार १०० रुपये होते. लवकरच हे दर वाढण्याची शक्यता रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवली.