नागपूर: भारतीय हवामान खात्याने आज कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्याच्या विविध भागात दमदार पाऊस सुरु आहे. तरीही अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली नाही. काही भागातच पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
हेही वाचा… चंद्रपूर : कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.