लोकसत्ता टीम

चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून येथील मिराज सिनेमागृहात ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान दुसरा तीन दिवसीय चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. यावेळी जेष्ठ दिग्दर्शक, निर्माते जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाची थीम ‘सिनेमा इज़ होप’ ही आहे. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. सर्वप्रथम नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा, आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘वल्ली’ (मराठी, दिग्दर्शक-मनोज शिंदे) हा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे. महोत्सवात देश-विदेशातील १७ चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

आणखी वाचा-‘स्टेट बँक’मधील सायबर फसवणुकीत दुप्पट वाढ! माहितीच्या अधिकारातून वास्तव उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट

वल्ली – दि. मनोज शिंदे, ह्युमनिस्ट व्यंपायर सिकिंग कन्सेंटिंग स्युसायडिकल पर्सन -दि. एरियन लॉइयस सीज, द फॉक्स-दि. एड्रियन गॉइजिंगर, इरत्ता – दि. रोहित एम. गी.कृष्णन, गुड्बाय ज्युलिया – दि. मोहम्मद कॉर्डोफनी, सिटी ऑफ विंड – दि. लखगवादुलम पुरेवोचिर, द साइरन – दि. सेपीडेह फारसी, लव इज फॉर ऑल – दि. जयप्रकाश राधाकृष्णन, द बर्डेनेड – दि. अमर गमाल, बिहाइंड द माउंटन्स – दि. मोहम्मद बिन अट्टाई, आर्ट कॉलेज १९९४ – दि. लुई जैन, भेरा – दि. श्रीकांत प्रभाकर, सिटिजन सेंट – दि. तीनातीन काजरिशविली, द बुरीटी फ्लॉवर – दि. जाओ साळविज आणि रेणी नाडेर मेसोरा, डेजर्ट – दि. फाऊदी बेनसैदी, बहादुर – दि. दिवा शाह, जिप्सी – दि. शशी चंद्रकांत खंदारे.