वर्धा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे हजारो शेतकऱ्यांचे आशास्थान. पण गत दशकभरात या बँकेस ग्रहण लागले होते. परिणामी शेतकरी हवालदिल झाले. त्यासोबतच बँकेत काम करणारे कर्मचारी पण व्यवहारात मरगळ आल्याने सुन्न असल्याची स्थिती होती. या बँकेला नवसंजीवन मिळावे म्हणून त्यावेळी आमदार असलेल्या डॉ. पंकज राजेश भोयर यांनी पाठपुरावा सूरू केला होता. सहकार खात्याने पण ही बाब गांभीर्याने घेत अनेक अडथळे दूर केले. त्यास उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा सढळहात दिला होता. आता कर्ज काही प्रमाणात देणे सूरू झाले. कर्मचारी दुर्लक्षित होते. त्यास आता चालना मिळणार.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील कार्यरत कर्मचा-यांच्या वेतनश्रेणी व महागाई भत्याचे नुतणीकरणासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह ग्रामीण व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सहकार विभागाच्या सचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

बॅंकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली होती. परिणामी रिजर्व बॅकेने बॅकींग परवाना रद्द केल्याने खातेदारांसह ४५० बॅक कर्मचा-यांसमोर गंभीर प्रश्न उभा ठाकला होता. डॉ. भोयर यांच्या प्रयत्नामुळे बॅकेला बॅंकींग परवाना परत मिळण्यासोबतच आर्थिक देखील करण्यात आली होती. मागील सहा वर्षांपासून बॅकेची आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर येत असून बॅके नफ्यात आली आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी हा प्रश्न हाती घेतल्याचे स्पष्ट केले. सध्या बॅंकेत ७० कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या बँकेची पूर्ण दारोमदार आहे. आर्थिक बचत करण्यासाठी बॅंकेत कर्मचारी भर्ती करण्यात न आल्यामुळे या कर्मचा-यांवर कामाचा प्रचंड बोझा असल्याचे कर्मचा-यांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या निर्दशनास आणून दिले.

बॅकेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना सन २००२ पासून पगार वाढ देण्यात आली नाही. बॅंकेच्सा कर्मचारी युनियने पगार वाढासंदर्भात पत्र दिले आहे. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी समितीने मान्यता प्रदान करून पुढील कार्यवाही करीता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याचे कर्मचा-यांना पालकमंत्री डॉ. भोयर यांना दिलेल्या निवेदनातून सांगितले.

सहकार आयुक्त यांच्याकडे पगार वाढीचा प्रस्ताव प्रलंबित असून त्याला मान्यात देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती ए. डी. बोडखे, ए.डी. झाडे, एस.डी. मुजबैले, आर. आर. मरसाडे, जी.वी. उमाटे, एस.यु.काकडे, व्ही.एन थुटे, पी.एस.थुटे, पी.एस.कुडे, ए.एच.शेख, जी.ए. गणी,बी.पी. इरखेडे, पी.पी. नेपटे, एस.व्ही. जाधव, एन.व्ही. बोबडे, यु.व्ही. बाकडे, व्ही. जे. बाकडे, हंसराज मुळे, सुनिल गावंडे, जे.एस. राऊत,एस.पी. उगले, एम.ए. धोपटे, व्ही. सी. देशमुख, एम.ए. शिंदे, व any कर्मचा-यांनी यावेळी केली. कर्मचा-यांची न्यायिक माागणी लक्षात घेत पालकमंत्री डॉ. भोयर यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देत खात्यास स्पष्ट निर्देश दिले आहे.