नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणावर सिमेंट व डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. जी पूर्ण झाली त्यापैकी काही ठिकाणी एका पावसातच डांबरी रस्त्यावरची गिट्टी उखडली व खड्डे पडले आहेत. सर्वत्र धूळ पसरली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये हे धुळीचे कण जात आहेत.

‘स्मार्ट सिटी’’च्या दिशेने वाटचाल सुरू आलेल्या उपराजधानीतील रस्त्यांची थोड्याच पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. डांबरी रस्ते उखडून जागोजागी गिट्टी उघडी पडली असून गिट्टीवरून वाहने घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ व धंतोलीसारख्या उच्चभ्रूंच्या वस्त्यांचीही स्थिती देखील अशीच आहे. शहरातील जुन्या वस्त्या अनुक्रमे महाल, बजेरिया, सेंट्रल अॅव्हेन्यू, गांधीबाग, गणेशपेठ भागातील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. सकाळी पाऊस आणि दिवसभर ऊन्ह यामुळे धुळींच्या कणाचाही त्रास वाढला आहे. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देणार की अपघाताची वाट पाहणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

स्थायी समितीने काही ठिकाणी पूर्ण डांबरी रस्ता तयार करणे व काही ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिकेने २० रस्त्यांच्या दुरुस्तीचे तसेच संपूर्ण डांबरी रस्ता तयार करण्याचे कार्यादेश दिले होते. यात ओंकारनगर सिमेंट रोड ते बेलतरोडी रोडपर्यंत कलोडे कॉलेजकडून जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश होता. या ८४० मीटर रस्त्याच्या कामासाठी ४ मार्च २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आले. या रस्त्याचे काम चार दिवसांपूर्वी पूर्ण झाले. दोन दिवसांत होणाऱ्या या ८४० मीटरच्या कामासाठी तीन महिने लागले. यावरून कामाची गती किती संथ आहे हे दिसून येते.

हॉटमिक्स प्लॅन्टची क्षमता

हिंगणा येथील हॉटमिक्स प्लॅन्टमध्ये् प्रतितास ३० टन डांबर तयार होते, तर नागपूर सुधार प्रन्यासच्या बॅचमिक्स प्लॅन्टची क्षमता प्रतितास ८० ते १०० टन इतकी आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी महापालिका नागपूर सुधार प्रन्यासची मदत घेणार आहे.

३ हजार ६४२ किमीचे रस्ते

शहरात ३ हजार ६४२.०८ किलोमीटरचे रस्ते आहेत. यातील यामध्ये दोन हजार ४८२.९४ किलोमीटरचे रस्ते महापालिकेच्या मालकीचे आहेत. ९६५.३२० किलोमीटरचे रस्ते नागपूर सुधार प्रन्यासकडे, १४८.०२ किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि २९.८०किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहेत.