लोकसत्ता टीम

वर्धा: प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून नागरिक निकराचा लढा देत आहे. बंद, धरणे नंतर आज लोटांगण आंदोलन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांनी दुपारी रणरणत्या उन्हात हे आंदोलन सुरू केले. गांधी पुतळा ते आमदार समीर कुणावार यांच्या घरापर्यंत ते लोटांगण घालत जाणार तोच पोलीसांनी धाव घेतली. श्याम यांना पकडुन स्थानबद्ध करण्यात आले. आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांनी याचा निषेध करीत हा सत्याग्रही गांधीजींचा अपमान असल्याचे मत मांडले. महाविद्यालयसाठी जनता आक्रमक झाली असून तणाव निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी अतुल वांदिले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… नागपूरकरांसाठी मेट्रोची खुशखबर, एक महिन्यासाठी मोफत महाकार्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय दबावातून आंदोलन दडपल्या जात असल्याचा आरोप प्रहारचे गजू कुबडे यांनी केला. तर काँग्रेसचे प्रवीण उपासे यांनी आमदार यांनीच दबाव टाकून हे आंदोलन उधळून लावल्याचा आरोप केला. आमदारांना सद्बुद्धी मिळो,असेही ते म्हणाले. या शासकीय महाविद्यालयास वर्धा येथे मंजुरी मिळाल्यानंतर हिंगणघाट व आर्वी येथून मागणी सुरू झाली आहे.