भंडारा : एमपीएससी पूर्व परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देतो, ४० लाख रुपये द्या, असं म्हणत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवण्याचे प्रकार पुण्यात घडले. मात्र या प्रकरणाचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यापर्यंत जुळलेले असल्याचे वृत्त काल ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम उघड केले. या प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन जण फरार आहे. फरार दोघांची नातेवाईक एक महिला अधिकारी या प्रकारातील मुख्य सूत्रधार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. फरार तरुणांचा शोध लागल्यास या महिला अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आज २ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्यापूर्वीच विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन आल्याची माहिती समोर आली होती. पुणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असतानाच याचे लोण भंडारा जिल्ह्यापर्यंत पोहचले. पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने वरठी येथून योगेश सुरेंद्र वाघमारे याला ताब्यात घेतले असून आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे हे दोघे भाऊ सध्या फरार आहेत. त्यांची एक नातेवाईक महिला अधिकारी या प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. या महिला अधिकाऱ्याचे वरपर्यंत लागेबांधे असून तिच्याच सांगण्यावरून या दोन्ही भावांनी हे कृत्य केले आहे. पैसा कमावण्याच्या हव्यासापायी या महिला अधिकाऱ्याने या तरुणांना या कामी लावले.फक्त आपले ओरिजनल कागदपत्रे जमा करावे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेलादेखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेली ऑडियो क्लिप समोर आली आणि सर्वांचेच पितळ उघडं पडलं. फरार तरुणांचा शोध लागल्यास या प्रकरणी जिल्ह्यातील आणखी किती जण यात गुंतले आहेत हे ही समोर येईल.