लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाले. यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे राज्यातील एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचे लक्ष लागले आहे.

आयोगाच्या अध्यक्षपदासाठी तीन नावांची फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर असून ते अध्यक्ष बनणे जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा-अबब! ७ ग्रॅमला ३२ हजार रुपये, सोन्याएवढ्या महाग ‘मॅफेड्रॉन’ मादक पदार्थाची तस्करी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सेवानिवृत्त झाल्यामुळे शासनाकडून नवीन अध्यक्षाची नियुक्तीची प्रक्रिया यापूर्वीच सुरु करण्यात आली. यासाठी मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती.

या समितीने तीन नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली आहे. त्यात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचही नाव आहे. इतर दोन नावांमध्ये एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने, वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीप कुमार यांची नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी वाचा-‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला, यवतमाळमध्ये १० रुग्ण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमपीएससी अध्यक्षपदासाठी तीन नावांपैकी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे लवकरच आयोगाला नवीन अध्यक्ष मिळणार आहेत.