वर्धा : महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यातील यात्रा करण्यास इच्छूक असणाऱ्यांना दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागाने विशेष सोय दिली आहे. विलासपूर ते रामेश्वरम् या दरम्यान दक्षिण भारत शुभ यात्रा ही विशेष गाडी धावणार आहे.

पंचवीस मे रोजी यात्रा शुभारंभ विलासपूर येथून होणार आहे. या स्थानकासह भाटापारा, नेवरा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, तिरोडा, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम व बल्लारशा या स्थानकांतून पर्यटक घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर रामेश्वरम्, मदुराई, तिरुपती व मरकपूर येथे थांबे राहणार. या स्थानक परिसरातील श्री शैलम, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग व अन्य स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : १८६ शाळांचे कोट्यवधीचे अनुदान थकले; ‘राईट ऑफ एज्युकेशन’अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळा व्यवस्थापनांची सरकारवर नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात दिवस, आठ रात्री असा कालावधी असून प्रवास, भोजन, हॉटेल मुक्काम, पर्यटन दर्शन, गाडी अशा सुविधा पंधरा हजार रुपयांत मिळतील. एकतीस मे रोजी परतीचा प्रवास सुरू होणार. अकरा डब्ब्यांची ही गाडी नॉन एसी आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ योजनेअंतर्गत ही यात्रा असल्याची माहिती इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझमच्या सह व्यवस्थापक डॉ. क्रांती सावरकर यांनी माध्यमांना दिली आहे.