लोकसत्ता टीम

गडचिरोली: जिल्हा पोलीस दलाने घेतलेल्या पोलीस भरतीत बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांद्वारे आरक्षणाचा लाभ घेऊन भरती झालेल्या दोन पोलीस शिपायांसह तात्पुरत्या यादीत निवड झालेल्या तीन उमेदवारांना २२ एप्रिलला अटक झाली.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सहाव्या फरार आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. देविदास ऊर्फ बाळू मेश्राम (रा. नवेगाव, ता. गडचिरोली) असे त्याचे नाव असून, तो आलापल्ली वनविभागात पेरमिली वनपरिक्षेत्रात वनरक्षक आहे.

हेही वाचा… नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चा रुग्ण!

चालक पोलीस व पोलीस शिपाई पदासाठी २०२१ मधील भरती प्रक्रियेत तसेच यापूर्वीच्या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता गडचिरोली येथील एका व्यक्तीच्या मदतीने बीड जिल्ह्यातील खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करून नोकरी मिळवल्याचा दावा करणारे एक निनावी पत्र पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना प्राप्त झाले होते.

हेही वाचा… सावधान! रसवंतीतला बर्फ धोकादायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांना दिले. त्यानंतर सातजणांवर गुन्हा नोंदवून राकेश देवकुमार वाढई (२९, रा. आलापल्ली, ता. अहेरी), वैभव दिलीप झाडे (२६, रा. नवेगाव, ता. मुडझा) या दोन पोलीस शिपायांसह तात्पुरत्या यादीतील आकाश रामभाऊ राऊत (२६), मंगेश सुखदेव लोणारकर (२६, दोघे रा. नवेगाव), मिन्नाथ पुरुषोत्तम थोरात (२९, रा. खरपुंडी) या पाचजणांना अटक केली होती. दोन आरोपी फरार होते, त्यापैकी देविदास मेश्रामला पोलिसांनी अटक केली.