नागपूर : बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला पत्र दिले होते आणि आता विरोध करीत आहेत. सध्या त्यांची अवस्था ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’  अशी झाली, आहे,अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केली.

भाजपच्या कार्यकर्त्याला डिवचले तर ते अपमान करतील आणि त्यावर उद्धव ठाकरे सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे ठाकरे यांनी वैयक्तिक टीका टाळावी,असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला. बारसू प्रकरणावर राजकारण करणे योग्य नाही. जनतेला हा प्रकल्प समजावून सांगितला पाहिजे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यात एकही प्रकल्प आला नाही ,याकडे  बावनकुळे यांनी लक्ष वेधले. २०२४ मध्ये शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २०० च्या वर जागा जिंकेल.  त्यामुळे महाविकास आघाडीने २०२९ नंतरच सत्तेवर  येण्याचा विचार करावा.

हेही वाचा >>> वर्धा : पोलिसांनी नोंद केला आकस्मिक मृत्यू; तपासाअंती पुढे आले सत्य, शंभर रुपयांसाठी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शिंदे फडणवीस हे दोन्ही नेते सामान्याचे नेते असून लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी रस्त्यावर फाईलवर सही करतात. मात्र अडीच वर्ष सत्तेत राहून पेन न चालवणा-या  उद्धव ठाकरे यांनी सरकारबाबत बोलू नये.  केवळ जनतेला चिथवण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कमकुवत कार्यकर्त्याकडून केले जात आहे. बाजार समितीची निवडणूक ही पक्षीय निवडणूक नसते त्यामुळे त्यात राजकारण करणे योग्य नाही. राज्यात सर्व बाजार समिती स्थानिक स्तरावर चांगले काम करीत आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी , काँग्रेस आणि इतर पक्षांना सोबत घेऊन सहकार पुढे न्या, त्यात राजकारण आणू नका असे आम्ही कार्यकर्त्यांना सांगितले, असे बावनकुळे म्हणाले.