उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्यात रायफल स्वच्छ करताना अचानक त्यातून गुरुवारी मध्यरात्री गोळी सुटली. ही गोळी सिलिंगला लागली व त्यामुळे झालेल्या जोरदार आवाजाने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सचिन बडोले (३०) हे गुरुवारी मध्यरात्री जरीपटका पोलीस ठाण्यात होते. त्यांच्याजवळ असलेली एसएलआर रायफल उभी ठेवून ते त्याला स्वच्छ करीत होते. अचानक त्यातून एक गोळी ‘फायर’ झाली. ही गोळी थेट वरच्या सिलिंगला लागली. अचानक घटलेल्या प्रकाराने झालेल्या आवाजाने येथील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवहानी न झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

हेही वाचा – संमेलनाच्या मांडवातून.. नाथांचा नंदादीप!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – विचारी लोक हीच हुकूमशहांची खरी चिंता! ; संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे परखड प्रतिपादन

तातडीने ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल आणि पोलीस उपायुक्त श्रवण दत्त, सहाय्यक पोलीस आयुक्तांना देण्यात आली. सगळ्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांकडून आंतर्गत चौकशीही केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.