वाशीम : माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांचेही सुंदर आयुष्य आहे. मात्र साप दिसला की त्याची माणसाची भंबेरी उडते. असाच काहीसा प्रसंग मालेगाव तालुक्यातील मसला खुर्द येथे आज सकाळी घडला. मनोज भगत हे सकाळी घराबाहेर पडले असता घरासमोरील मोकळया शेतात साप लढाई करताना दिसले. कुणी म्हणाले त्यावर कपडा टाका तर कुणी म्हणाले पैसे टाका. मात्र, तो प्रसंग पाहूण अनेकांनी काहीही न करता शांत राहणे पसंत केले. त्यानंतर तिथून साप निघून गेले.
सापांचे आणि माणसाचे फार जुने नाते आहे. पुर्वी सापांचे प्रमाण अधिक होते. परंतू, कालांतराने सापाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. जंगली भागात सापांचा अधिवास असला तरी लोकवस्तीत तुरळक प्रमाणात साप आढळून येतात. मालेगाव तालुक्यात तपोवन जंगल परिसर आहे. या भागात जंगली प्राणी आहेत. आणि या परिसरातच मसला खुर्द गाव आहे. येथे आज सकाळी मनोज भगत यांच्या घरासमोरील मोकळया शेतात दोन सापांची लढाई दिसून आल्याने अनेकांची भंबेरी उडाली. मात्र, कुणीही पुढे न येता त्यावर पांढरा कपडा टाका, किंवा पैसे टाका असे काहींनी म्हटले मात्र कुणाचेही धाडस झाले नाही. काही वेळाने तिथून ते साप निघून गेल्यानंतर नागरीकांनी मोकळा श्वास सोडला. तर काहींनी अविस्मरणीय प्रसंग असल्याबददल समाधान व्यक्त केले.
आणखी वाचा-VIDEO : ‘नयनतारा’ला ‘भोला’ अन् ‘शिवा’ची भीती! शिकार लपवण्यासाठी ‘ति’ने काय केले, एकदा पहाच…
ते दोन्ही धामण जातीचे नर असून जो लढाईत उंच झेप घेईल, त्याचा संगम मादीशी होईल. सध्या धामण जातीचा मिलन काळ सुरु आहे. त्यानुसार धामण जातीची मादी विशिष्ट प्रकारचा गंध सोडते. या विशिष्ट सुगंधामुळे जवळच्या १ ते २ किमी परिसरातील नर जातीच्या धामण सापांमध्ये अशी लढाई होते. त्यामुळे असा प्रसंग कुठे दिसून आला तर नागरिकांनी त्यांना त्रास न देता निघून जावे. –आदित्य इंगोले, सर्प मित्र अभ्यासक तथा निसर्ग प्रेमी.