नागपूर : बेलतरोडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोन चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन पोलीस ठाण्यातून पळ काढल्याची चर्चा शनिवारी दिवसभर होती. मात्र, ते चोरटे पळाले नसून त्यांना सूचनापत्र देऊन सोडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अशा अफवांना पूर्णविराम मिळाला.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरात दोन अल्पवयीन मुले घुसले. त्यांनी मंदिरातील दान पेटी फोडली. काही मूर्त्याही चोरल्या. पळून जात असताना बेलतरोडी ठाण्यातील तपास पथकाने (डीबी) त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १४० रुपये मिळून आले. दोघेही अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. दोघांचेही आधारकार्ड आणि अन्य माहिती पोलिसांनी घेतली. मात्र, दोघेही अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना सूचनापत्र दिले.

हेही वाचा – यवतमाळ : ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले, फसवणूक झाली पण..

तपासात सहकार्य करण्यासाठी पोलिसांनी बोलावल्यानंतर ठाण्यात हजर होण्याची तंबी देण्यात आली. त्यानंतर दोघांनाही सोडण्यात आले. यानंतर शहरात दोन चोरटे ठाण्यातून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याची अफवा पसरली. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. ‘दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले,’ अशी माहिती बेलतरोडीच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी दिली.

हेही वाचा – चंद्रपूर : अंत्यसंस्कार करतेवेळी मधमाश्यांचा हल्ला, ४२ जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या दोनपैकी एका मुलाने प्रेयसीला पळून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यासह दोन अन्य मित्रांना तिरोडा शहरात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.