भंडारा : जिल्ह्यात रेती चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. रोज लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी केली जात आहे. त्यातूनच अनेकदा रेती चोरी रोखण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांवर रेती तस्करांचे जीवघेणे हल्ले होत आहेत.

अशीच एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडाऱ्यात वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रकार घडला. यामध्ये त्र्यंबक गायधने हे पोलिस कर्मचारी जखमी झाले. यात पोलीस कर्मचारी गायधने गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनेक ट्रॅक्टर जप्त केले असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.

भंडारा जिल्ह्यातील बेलगाव फाटा येथे अंगावर ट्रॅक्टर आणल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव त्र्यंबक गायधने (वय ३४) असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. रेती चोरी रोखायला- गेलेल्या पोलिसावर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर चढवून चिरडण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस कर्मचारी गायधने गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनेक ट्रॅक्टर जप्त केले असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.

कारधा पोलिस ठाण्याचे पोलिस पथक शनिवारी दुपारी बेलगाव शिवारातील वैनगंगेच्या घाटावर वाळू चोरीस प्रतिबंध करण्यास वेगवेगळ्या मार्गाने गेले होते. या घाटावर अनेक ट्रॅक्टरमधून वाळू चोरी केली जात होती. मात्र, पोलिस आल्याचे कळताच ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळीच वाळू टाकून वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात बेलगाव फाटा येथे पोलिस कर्मचारी त्र्यंबक गायधने यांनी पळून जात असलेला ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्याच्या अंगावर वाहन आणले. यात गायधने यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.

यात गायधने यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचाराकरिता भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे. कारवाई दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाळू चोरीचे सुमारे १५ ट्रॅक्टरवर कारवाई केली.यामध्ये बहुतेक ट्रॅक्टर व ट्रॉली हे वीना क्रमांकाचे आहेत. कारधा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.

पोलिसांनी रेती माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पोलिसांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक सतर्क राहून कारवाई करण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

” ट्रॅक्टरचालकाने घाबरून जाऊन थेट गायधने यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, रेती चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.