चंद्रपूर : राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या सहाव्या वर्गातील मुलीवर ओळखीच्याच २२ वर्षीय युवकाने जंगलात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकत होती. शाळा सुटल्यावर पीडिता खाऊ घेण्यासाठी बाहेर आली असता, तिच्या मागावर असलेल्या २२ वर्षीय युवकाने तिला घरी सोडून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसविले. त्यानंतर पीडित मुलीला एका निर्जनस्थळी जंगलात नेवून अत्याचार केला. दरम्यान, शाळेला सुट्टी होऊन बराच वेळ होऊनदेखील पीडित मुलगी शाळेत न आल्याने बसचालकाने विचारपूस केली असता, एका युवकाने तिला दुचाकीवर बसवून नेण्याचे समोर आले.

हेही वाचा – ‘समृद्धी’वर अतिवेगाचे दोन बळी; आई-वडिलांचा मृत्यू, मुलाची मृत्यूशी झुंज..

हेही वाचा – उद्या पृथ्वीजवळून जाणार २०० मीटर व्यासाचा लघुग्रह, वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधून मुलीचा शोध घेण्यास सांगितले. त्याचदरम्यान युवकाने पीडितेस घरी सोडले. यावेळी पीडितेची विचारपूस केली असता, युवकाने जंगलात नेऊन अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या पालकांनी राजुरा पोलीस ठाणे गाठत घटनेची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकास अटक केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.